Saturday, April 27, 2024
Homeनाशिककोविड सेंटरमध्ये ऑक्सिजनची सुविधा सुरू

कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजनची सुविधा सुरू

पिंपळगाव बसवंंत। वार्ताहर

येथील ग्रामीण रुग्णालयात कोविड केअर सेंटर बाधित रुग्णांच्या सेवेत रुजू झाले आहे .

- Advertisement -

या रुग्णालयात दोन वेगळ्या हॉलमध्ये प्रत्येकी 15 बेड व एका हॉलमध्ये 10 बेड अशी एकूण 40 बेडची ऑक्सिजन सेवा सुरू करण्यात आली आहे. आज तीन रुग्ण दाखल केले असून त्यांना ऑक्सिजन पुरवठा सुरू करण्यात आला असल्याचे आमदार दिलीप बनकर यांनी म्हटले आहे.

कोविड सेंटरला ऑक्सिजन पुरवठा करण्याकरिता 700 किलो ग्रॅम वजनाचा डूरा सिलेंडर इन्स्टॉल करण्यात आला असून 5 जम्बो सिलेंडर तसेच दहा किलो वजनाचे दहा सिलेंडर इन्स्टॉल करण्यात आले आहे. पिंपळगाव बसवंत मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशनचे सर्व खासगी डॉक्टर्स आपली सेवा देणार असून यामध्ये प्रामुख्याने एमडी फिजिशियन डॉ.मनोज बर्डे, डॉ.अश्विन मोरे, डॉ.उमेश आहेर, डॉ.महेश बूब, डॉ.संजय शिंदे, डॉ.सतीश शिरसाठ, डॉ.पंजाबी हे आठवड्यातील सात दिवस वेगवेगळ्या वेळेला आपली सेवा देणार आहेत.

लासलगाव ग्रामीण रुग्णालयात 30 बेडची ऑक्सिजन सुविधा असून आता नव्याने पिंपळगाव बसवंत येथे 40 बेडची सुविधा सुरू करण्यात आल्याने आरोग्य व्यवस्थेवरील बराच मोठा येणारा ताण कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच पिंपळगाव येथील एमडी फिजिशियन डॉक्टर आपली सेवा देणार असल्याने लवकरच व्हेलटीनेटरची सुविधा सुरू होणार आहे.

या कोविड हॉस्पिटलमध्ये करोना रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या सर्व सोई-सुविधा देणेकरिता मी प्रयत्न करीत असून डॉ.रोहन मोरे व त्यांच्या टीमने सुचविलेल्या अडचणी आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे, जिल्हाधिकारी सुरेश मांढरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुरेश जगदाळे यांच्या माध्यमातून सोडविण्यात येत आहेत. पिंपळगाव बसवंत येथील डॉ.रोहन मोरे, वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय यांनी कोविड रुग्णालय सुरू करणेकरिता कसोशीने प्रयत्न केले आहे.

कोविड रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू होणेकरिता डॉ.रोहन मोरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.चेतन काळे प्रयत्नशील आहे. त्यांचे सर्व डॉक्टर्स तालुक्यातील करोना बाधित रुग्णांना सेवा देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करीत आहेत..

- Advertisment -

ताज्या बातम्या