Saturday, April 27, 2024
Homeनाशिकउद्योगांना ऑक्सिजनचा पुरवठा होणार

उद्योगांना ऑक्सिजनचा पुरवठा होणार

सातपूर । प्रतिनिधी Satpur

वैद्यकीय उपचारासाठी प्राथमिकता असल्याने उद्योगांचा ऑक्सिजन पुरवठा पूर्णपणे थांबवत तो रुग्णालयांकडेे वळवण्याचे आदेश गेल्या महिन्यात जिल्हाधिकार्‍यांनी दिले होते.

- Advertisement -

मात्र काही दिवसांपासून ऑक्सिजनची गरज असणार्‍या रुग्णांंची घटती संख्या व ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होऊ लागल्याने उद्योगांनाही ऑक्सिजन पुरवण्यास जिल्हाधिकार्‍यांनी आदेश दिले आहेत.

अडचणीत आलेल्या उद्योगांना हजार सिलिंटरपर्यंत ऑक्सिजन देणे शक्य असल्याची माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक तथा ऑक्सिजन पुरवठा समन्वयक सतीश भामरे यांनी दिली. यामुळे उद्योजकांना दिलासा मिळाला आहे.

सध्या नाशिक जिल्ह्यातील ऑक्सिजन उत्पादकांकडून दररोज 1500 सिलिंडरचे उत्पादन केले जाते. वैद्यकीय कारणासाठीची मागणी आहे. त्यानंतरही सध्या पाचशे सिलिंटर अतिरिक्त शिल्लक राहत आहेत.

याशिवाय 3 हजार सिलिंडरचा बफर स्टॉकही जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध आहे. उद्योजकांची ऑक्सिजन अभावी होत असलेली अडचण समोर ठेवत सिलिंडरची मागणी केली होती. ऑक्सिजनची मागणी केलेल्या उद्योगांना याबाबतचे पत्र देण्यात येणार असून पुरवठादारांनाही आदेशीत करण्यात येणार आहेत.

सुदैवाने सध्या वैद्यकीय क्षेत्राची मागणी नियंत्रणात आली आहे. त्यामुळे ज्यां उद्योगात जास्त कामगार आणि कमी ऑक्सिजनची आवश्यकता आहे, अशा उद्योगांना दिवसाला चार हजार सिलेंडर इतके ऑक्सिजन पुरविण्याबाबत जिल्हाधिकार्‍यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे.

सतीश भामरे, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र

- Advertisment -

ताज्या बातम्या