Friday, April 26, 2024
Homeजळगावगरजू रुग्णांसाठी 7 ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर उपलब्ध

गरजू रुग्णांसाठी 7 ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर उपलब्ध

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

करोना काळात अनेक नागरिकांना आणि रुग्णांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असून गेल्या काही दिवसात रुग्णालयात बेड न मिळणे, ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर उपलब्ध न होणे, इंजेक्शनचा तुटवडा आदी समस्या भेडसावत आहे.

- Advertisement -

आजही कोविडचे बरेचसे रुग्ण गृहविलगीकरणात असून त्यांना घरीच ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर उपलब्ध व्हावे, या दृष्टीने सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणार्‍या केशवस्मृती प्रतिष्ठानतर्फे रुग्णांसाठी 7 ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर उपलब्ध करून दिले आहेत. या मशिनचा लोकार्पण सोहळा आज सायंकाळी 5 वाजता नवी पेठेतील केशवस्मृती प्रतिष्ठानच्या कार्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.

यावेळी प्रेम कोगटा,संजय बिर्ला,संजय नारखेडे, डॉ.नितीन चौधरी, डॉ.धर्मेंद्र पाटील, रा.स्व. संघाचे देवगिरी प्रांत प्रचार प्रमुख स्वानंद झारे, प्रांत कार्यकारिणी सदस्य योगेश्वर गर्गे, रत्नाकर पाटील, सचिन चोरडिया, नंदू अडवाणी, शरद कोत्तावार, भानुदास येवलेकर, हेमंत भिडे, सागर येवले उपस्थित होते.

या मशीन केशवस्मृतीच्या मुख्य कार्यालयात उपलब्ध राहणार असून ज्या रुग्णांना याची गरज भासत असेल त्यांनी रुग्णास ऑक्सिजनची गरज असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र, किती लिटर ऑक्सिजनची गरज आहे त्याचा तपशील, ज्या रुग्णासाठी हवे आहे त्यांचे आधारकार्ड, पूर्ण पत्ता व इतर आवश्यक तपशील, मशीन नेणार्‍याचे आधारकार्ड, ओळख असणार्‍या व्यक्तीचा संपूर्ण तपशील सादर करणे गरजेचे असेल.

ऑक्सिजन मशीन ही 5 लिटर क्षमतेची असणार आहेत. रुग्णास लागणार्‍या ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर गरज नसल्याचे चित्र लक्षात आल्यावर हे ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर केशवस्मृतीस परत करावयाचे आहे. त्यासाठी प्रतिदिवस 100 रु. शुल्क आकारण्यात येणार आहे.

ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर अभावी कोणत्याही रुग्णास आपला जीव गमवावा लागू नये, याच भावनेतून केशवस्मृती प्रतिष्ठानच्या वतीने ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून यासाठी मुंबई स्थित सेवा इंटरनॅशनल व पुणे येथील मुकुल माधव फाउंडेशन यांचे सहकार्य लाभले आहे.

या ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर गरज असणार्‍या रुग्णाच्या नातेवाईकांनी रोहन सोनगडा मो.9921472766 किंवा केशवस्मृती प्रतिष्ठान 0257 2236166/69 येथे संपर्क करावा, असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या