Thursday, April 25, 2024
Homeनाशिककॅन्टोमेन्ट हॉस्पिटलला ऑक्सिजन बेड उपलब्ध होणार : खा. गोडसे

कॅन्टोमेन्ट हॉस्पिटलला ऑक्सिजन बेड उपलब्ध होणार : खा. गोडसे

दे.कॅम्प। वार्ताहर

करोना चे वाढते संकट लक्षात घेऊन येथील कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलसाठी शासनाचे माध्यमातून नव्याने 50 ऑक्सिजन बेड उपलब्ध करून दिले असून त्याची पूर्तता येत्या 2 दिवसात होणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.

- Advertisement -

कॅन्टोमेन्ट हॉस्पिटल मागील वर्षी देखील डेडिकेटेड कोविड केअर सेंटर म्हणून कार्यरत असताना करोनाचा वाढता प्रादुर्भाव व ऑक्सिजन बेडची जाणवणारी कमतरता लक्षात घेत खा. गोडसे यांनी दोन आठवड्यापूर्वी जिल्हा आरोग्य अधिकारी यांची भेट घेत येथील हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन बेड वाढविण्याबाबत सूचना केल्या होती.त्या सूचनेला मंजुरी देण्यात आली आहे.

देवळाली कॅम्पसह ग्रामीण भागातील 52 पेक्षा अधिक खेड्यांतील नागरिकांना उपचार देणार्‍या कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये कोविडग्रस्तांवर उपचार करण्यासाठी एकूण 80 आयोसोलेटेड बेड उपल्बध आहे. यापैकी मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात 30 बेड हे ऑक्सिजन करण्यात आलेले होते. त्यानंतर वाढलेली रुग्णसंख्या व ऑक्सिजनची बेडची कमतरता या बाबद नागरिकांनी खा. गोडसे यांच्याकडे तक्रार केली होती.

त्याची दखल घेऊन तात्काळ जिल्हा आरोग्य विभागाचे आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर व डॉ.दावल साळवे यांच्याशी खा.गोडसे यानी चर्चा केली. त्यानंतर शनिवार दि.18 रोजी या सूचनेला त्यांनी मंजुरी देतांना हॉस्पिटलमध्ये सर्व यंत्रणा तयार करून दिली जाणार असल्याचे खासदार गोडसे यांना सांगितले.

ऑक्सिजन महत्वाचे

हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन बेड उपलब्ध करून दिले जात आहे, हे महत्त्वाचे आहे, परंतु सद्या जे 30 बेड ऑक्सिजन चे आहेत त्यांना देखील नियमित ऑक्सिजन पुरवठा होत नाही, जिल्हा आरोग्य विभागाने ऑक्सिजन व इतर सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.

डॉ.जयश्री नटेश, मुख्य वैद्यकीय अधिकारी, कॅन्टोमेन्ट हॉस्पिटल

- Advertisment -

ताज्या बातम्या