विद्यार्थ्यांसाठी परदेश शिष्यवृत्ती योजना

jalgaon-digital
1 Min Read

नाशिक । प्रतिनिधी

अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात पदव्युत्तर पदवी आणि संशोधनात्मक अभ्यासक्रमाच्या (पीएच.डी) अध्ययनासाठी आर्थिक मदत करण्यात येते.

या योजनेंतर्गत 2021-2022 शैक्षणिक वर्षाकरता विद्यार्थ्यांकडून परदेशी शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागवण्यात येत असून अर्ज करण्याची अंतिम मुदत 14 जून 2021 पर्यंत आहे. या योजनेत विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन समाजकल्याण विभागाने केले आहे.

सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात अध्ययनासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेंतर्गत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते.

पदव्युत्तर पदवी आणि पीएच.डीसाठी जागतिक स्तरावर तीनशेच्या आतील रँकमधील परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेणार्‍या 75 विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्याने नमुन्यातील अर्ज राज्याच्या संकेतस्थळावरील रोजगार या लिंकवरून डाऊनलोड करून घ्यावा.

हा अर्ज संबंधित इ-मेलवर पाठवून त्याची प्रत मुदतीत आवश्यक कागदपत्रांसह समाजकल्याण आयुक्तालय, चर्च पथ, पुणे या पत्त्यावर द्यावी.

विमान भाडे मिळणार

योजनेसाठी पात्र विद्यार्थ्यांना विमान प्रवास भाडे, परदेशातील शैक्षणिक संस्थेचे शिक्षण शुल्क, निर्वाह भत्ता, आकस्मिक खर्च याचा लाभ मिळणार आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 35 वर्षे आणि पीएच.डीसाठी 40 वर्षे कमाल वयोमर्यादा असेल.

भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या संकेतस्थळावरील एम.डी. आणि एम. एस. अभ्यासक्रमच प्रवेशासाठी पात्र असतील. तसेच वार्षिक उत्पन्न सहा लाखांपेक्षा जास्त नसावे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *