Friday, April 26, 2024
Homeजळगावग्रामपंचायत व लोकसहभागामुळे गावाचा सर्वांगीण विकास : पेरे पाटील

ग्रामपंचायत व लोकसहभागामुळे गावाचा सर्वांगीण विकास : पेरे पाटील

पाळधी Paldhi ता. धरणगाव| प्रतिनिधी

सरपंच (Sarpanch) व ग्रामसेवक (Gramsevak) यांच्यातील समन्वय (Coordination) व त्यांना लोकसहभागाची (Public participation) साथ मिळाल्यास खऱ्या अर्थाने गावाचा (village) सर्वांगीण विकास (Development) साधला जातो. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी निधी (Funding) हा महत्त्वाचा घटक असून त्यासाठी जनतेने नियमित कर भरणे गरजेचे आहे. ग्रामपंचायतीने (Gram Panchayat) नियमित कर (Tax) भरणाऱ्यांना प्राधान्याने सुविधा देणे (Facilitate) हे कर्तव्य असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श सरपंच (Adarsh Sarpanch) पेरे पाटील (Pere Patil) यांनी धरणगाव तालुक्यातील अनोरे (Anore) येथे केले . तर विकासासाठी ध्येय व नियोजन (Planning) महत्वाचे असून अनोरे गाव आदर्श करण्यासाठी सर्वोतोपरी मदत करण्याची ग्वाही पालकमंत्री (Guardian Minister) गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी दिली. १०० सौर ऊर्जेच्या पथदिव्यांच्या लोकार्पण प्रसंगी दिली.

- Advertisement -

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रमेश अण्णा महाजन हे होते. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते बटण दाबून १०० सौर ऊर्जेच्या (Solar energy) पथ दिव्यांचे (Path lights) लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी ग्रामस्थांनी (Villagers) जल्लोष केला. जिल्ह्यात प्रथमच एकाच वेळेला सौर उर्जेवरील १०० पथ दिव्यांचे लोकार्पण (Dedication) करण्यात आले हे विशेष !
यावेळी पेरे पाटील म्हणाले की, गावकऱ्यांनी काम करणाऱ्या सरपंच (Sarpanch) व पदाधिकाऱ्यांवर विश्वास (Faith) ठेवून त्यांना भक्कम साथ देण्याची गरज आहे. तर गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) हे शब्द पाळणारे मंत्री असून त्यांच्या नेतृत्व व दातृत्वाचा फायदा गावं विकासाठी करावा असे आवाहन या प्रसंगी केले.

विकासासाठी ध्येय व नियोजन महत्वाचे – ना. गुलाबराव पाटील

पालक मंत्री (Guardian Minister) गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी अनोरे येथील अभिनव उपक्रमाची स्तुती केली. विदेशवारी केलेले तरुण सरपंच स्वप्नील महाजन (Sarpanch Swapnil Mahajan) यांच्या कार्याचा देखील कौतुक करून अस्तित्व फाउंडेशन (Astitva Foundation) चे आभार मानून कौतुक केले. जिल्ह्यात गाव आदर्श करण्यासाठी अस्तित्व फाउंडेशन सारख्या संस्थांनी व व्यक्तींनी दानशूर व्यक्तींनी (generous individuals) पुढे येऊन लोकसहभाग देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन नाही पालकमंत्री पाटील यांनी केले या गावाच्या विकासासाठी निधीची (Funding) कमतरता भासू देणार नसून अनोरे गाव आदर्श करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही देखील त्यांनी दिली.

अस्तित्व फाउंडेशनचा असाही पुढाकार !

गावाला स्वप्नील महाजनयांच्या रूपाने उच्चशिक्षित व तरुण सरपंच लाभल्यामुळे गावात लोकसहभागाद्वारे (public participation) विकास (Development) कामे व्हावी यासाठी अस्तित्व फाउंडेशनचे चेअरमन मिलींद पाटील (Chairman Milind Patil) व त्यांच्या सर्व सहकारी सदस्यांनी अनोरे गावासाठी सौर ऊर्जेवर चालणारे १०० पथदिवे दिल्याने गाव विकासासाठी पुढाकार घेतल्याबद्दल चेअरमन मिलिंद पाटील व त्यांचे सर्व सहकारी यांचे सर्वच मान्यवरांनी कौतुक केले.

प्रास्ताविकात सरपंच स्वप्नील महाजन यांनी गावाच्या विकासासाठी (Village development) लोकसहभाग हा महत्त्वाचा असून त्यासाठी गावकऱ्यांची साथ मिळत असल्याचे सांगून नियमित व वेळेवर कर भराणाऱ्याना मोफत आर ओ चे पाणी (Free RO water) देणार असल्याचे सांगून गाव आदर्श (Ideal) करण्यासाठी प्रयत्नशील (Effortless) राहणार असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन उपशिक्षक ए. के. पाटील यांनी केले तर आभार माजी सरपंच रमेशनाना महाजन यांनी मानले.

यांची होती उपस्थिती

याप्रसंगी व्यासपीठावर शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, अस्तित्व फाऊंडेशनचे चेअरमन मिलिंद पाटील व त्यांचे सहकारी सदस्य, काँग्रेसचे डी.जे. पाटील, राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, भाजपाचे तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन पवार, जि. प. सदस्य गोपाल चौधरी, पं. स.चे माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे , उपसरपंच रूपालीताई पाटील, ग्रामपंचायत सदस्य मनीषा महाजन, मंगलाबाई गायकवाड, कल्पनाताई कापडणे, तुकाराम गायकवाड, अधिकार पाटील, जिजाबाई पाटील, धानोराचे सरपंच भगवान महाजन, ग्रामसेवक अनिल पाटील यांच्यासह परिसरातील सरपंच, उपसरपंच, ग्रा. पं. सदस्य विविध पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या