Thursday, April 25, 2024
Homeनगरराहुरीच्या पूर्वभागात पिकांवर लष्करी अळीचा प्रादूर्भाव

राहुरीच्या पूर्वभागात पिकांवर लष्करी अळीचा प्रादूर्भाव

आरडगाव |वार्ताहर| Aradgav

राहुरी (Rahuri) तालुक्याच्या पूर्वभागात पावसाने चांगली हजेरी लावली असल्यामुळे पिके (Crops) जोमात आहेत. मात्र, लष्करी अळीच्या (military larvae) प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.

- Advertisement -

जनावरांना लागणारा हिरवा चारा, मका या पिकाची शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात पेरणी केली आहे. पण याच पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा (American Military larvae) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत असल्याने ही पिके (Crops) अडचणीत आली आहेत. यावरील किटकनाशकांचा (Pesticides) होणारा खर्च मोठा असल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.

शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत असून करोनामुळे बाजारपेठा बंद होत्या. त्या काळात उत्पादन केलेल्या मालाला भाव मिळाला नाही. त्यात भर म्हणून मकावर लष्करी अळी आल्यामुळे व त्यावरील किटकनाशकांचा (Pesticides) होणारा खर्च मोठा आहे. तसेच दुधाला भाव मिळत नसल्याने शेतकरी दुहेरी अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीत कृषी विभागाने शेतकर्‍यांना औषधे उपलब्ध करुन द्यावीत, अशी मागणी मका उत्पादक शेतकर्‍यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या