Saturday, April 27, 2024
Homeनाशिकपिकांवर 'या' रोगांचा प्रादुर्भाव

पिकांवर ‘या’ रोगांचा प्रादुर्भाव

हरसूल । वार्ताहर

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील (Tryambakeshwar Taluka) हरसूल (Harsul) भागातील शेतपिकांवर (Agriculture) विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला असून टाक्या, तंबोरा रोगाची लक्षणे दिसून येत आहे.

- Advertisement -

यामुळे शेतकरी (Farmers) पुन्हा एकदा हवालदिल झाला आहे. कृषी विभागाने (Department of Agriculture) उपाययोजना करण्याची मागणी शेतकरीवर्गाकडून केली जात आहे.

हरसूलसह परिसरात भात (Rice) पिकाबरोबर नागली (Nagli), वरई, कुळीद, उडीद, भुईमूग, तूर तसेच आंबा (Mango) पिकांची शेतकर्‍यांनी मोठी लागवड केली आहे. सुरुवातीपासून समाधानकारक पडणार्‍या पावसाच्या भरोवशावर शेतकर्‍यांनी आशेची पेरणी केली आहे. मात्र ऐन पिकांच्या लागवडीच्या वेळी पावसाने दडी मारत शेतकर्‍यांची झोप उडविली. सद्यस्थितीत अवनी केलेल्या पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे.

हरसूल परिसरातील ठाणापाडा, दलपतपूर, चिरापाली, सापतपाली तसेच तोरंगण परिसरातील भात पिकांवर टाक्या, तांबोरा, करपा जातीच्या रोगाच्या प्रादुर्भावाची लक्षणे दिसून येत आहे. तालुका कृषी विभागाच्या माध्यमातून उपाययोजना करण्याची मागणी शेतकरीवर्गाकडून केली जात आहे.

हरसूल भागातील शेतीपिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाला असून टाक्या, तांबोरा, करपा रोगाची लक्षणे दिसून येत आहे. काही ठिकाणी भात पीक अगदी फुलोर्‍यात आले आहे. कृषी विभागाकडून उपाययोजना करण्यात याव्यात.

– इरफान शेख, जिल्हा सचिव माकप

- Advertisment -

ताज्या बातम्या