Friday, April 26, 2024
Homeनाशिकदिंडोरी तालुक्यातील द्राक्षबागांना रोगांचा प्रादुर्भाव

दिंडोरी तालुक्यातील द्राक्षबागांना रोगांचा प्रादुर्भाव

ओझे | Oze

दिंडोरी तालुक्यातील द्राक्षे पंढरी सध्या वातावरणातील बदलावाच्या परिस्थितीमुळे चिंतातुर झाली आहे. त्यामुळे यंदाचा द्राक्षे हंगाम कसा घ्यावा ही मोठी समस्या निर्माण झाल्याने बळीराजां हतबल झाला आहे.

- Advertisement -

सध्या जिल्हाभरात पावसाने थैमान घातले असून दिंडोरी तालुक्यातील द्राक्षबागांना याचा फटका बसला आहे.द्राक्ष बागांवर अनेक रोगांचा प्रादुर्भाव झाला असून यामध्ये गळ, कुजीचा धोका वाढला आहे. गेल्या काही दिवसापासून वातवरणात कमालीचे बदल जाणवत आहे. सकाळी दाट धुके, दुपारी कडक ऊन आणि संध्याकाळी परतीच्या पावसाचे आगमन यामुळे शेतकरी वर्ग मेटाकुटीस आला आहे.

दिंडोरी तालुक्यातील लखमापूर, म्हेळुसके, ओझे, करजंवण, दहिवी, दहेगाव वागळुद, अवनखेड, कोराटे, मोहाडी, मडकीजांब, जाबूटके, परमोरी, राजापूर, मातेरेवाडी,बोपेगाव, खेडगाव, सोनजांब, तिसगाव बहादुरी, मावडी, शिवरे बोराळे, वणी, इ. प्रमुख द्राक्षे उत्पादक गावांना वातावरणातील बदलाचा मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सध्या तालुक्यातील शेतकरी वर्ग छाटलेल्या द्राक्षे बागामध्ये पेस्टलावण्यात व्यस्त असुन पाऊस वेळोवेळी पडत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या