Thursday, April 25, 2024
Homeनाशिकशाळा बाहय विदयार्थी शोध; मोहिमेला १५ जूनपर्यंत स्थगिती

शाळा बाहय विदयार्थी शोध; मोहिमेला १५ जूनपर्यंत स्थगिती

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

जिल्ह्यात करोनाचा प्रभाव वाढत असल्याने शाळा बाहय विदयार्थी शोधमोहिमेला शिक्षण उपसंचालक नितिन उपासनी यांनी १५ जूनपर्यंत स्थगिती दिली आहे. जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटना आणि मुख्याध्यापक संघाने स्थगितीची मागणी केली होती.

- Advertisement -

राज्याचे शिक्षण विभागाने दि. १ मार्च ते १० मार्च दरम्यान राज्यात शाळा बाहय विदयार्थ्यांचे सर्वेक्षण शिक्षकांनी करावे असा आदेश दिला होता.

मात्र जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता हे सर्वेक्षण रद्द करावे अशी मागणी केली होती.

नाशिक जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत कुशारे, संजय गिते, बी. के. सानप, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे कार्यवाह एस. बी. देशमुख, प्रदिप सांगळे, बी. के. नागरे, एस. के. देसले यांनी नितीन उपासनी यांची भेट घेऊन स्थगितीची मागणी केली होती.

दि. 3 ला मागणी केल्यानंतर दि. ५ ला उपसंचालक यांनी स्थगिती दिल्याने जिल्हा संघटनेतर्फे समाधान व्यक्त केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या