Thursday, April 25, 2024
Homeनाशिकशाळाबाह्य मुलांमध्ये ‘बालकामगार’; सर्वाधिक मुले नाशकातील

शाळाबाह्य मुलांमध्ये ‘बालकामगार’; सर्वाधिक मुले नाशकातील

नाशिक | प्रतिनिधी

राज्यात शाळाबाह्य म्हणून आढळलेल्या मुलांपैकी २८८ मुले बालकामगार असल्याचे वास्तव शाळाबाह््य मुलांच्या शोधमोहिमेतून उघड झाले आहे. नाशिक, पालघर, मुंबई, वर्धा, यवतमाळ, नांदेड यासह अन्य जिल्ह्यांमध्ये हे बालकामगार आढळले आहेत…

- Advertisement -

यात बालकामगार मुलांपैकी सर्वाधिक ८५ मुले नाशिक जिल्ह्यात, त्या खालोखाल पुणे जिल्ह्यात ५८, पालघर ३८, नंदूरबार ३०, नांदेड जिल्ह्यात १७, वर्धा जिल्ह्यात १२, यवतमाळ जिल्ह्यात १३ बालकामगार असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. राज्याबाहेर स्थलांतरित होऊन गेलेल्यांमध्ये ७ ३६५ मुले, ६ ७१९ मुली आहेत, असेही म्हटले आहे.

शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी राज्यव्यापी शोधमोहीम १ ते १० मार्च या कालावधीत राबवली गेली. यात २५ हजार २०४ विद्यार्थी शाळाबाह्य असल्याचे स्पष्ट झाले.

शोध मोहिमेचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला आहे. या मुलांमध्ये २८८ बालकामगार, १ हजार २१२ विशेष गरजा असलेली मुले आहेत.

तर २३ हजार ७०४ मुले अन्य कारणांमुळे शाळाबाह्य झाली असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

परराज्यातून स्थलांतरित होऊन आलेल्या मुलांमध्ये ४ हजार १७२ मुले, ३ हजार ६१२ मुली आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या