Friday, April 26, 2024
Homeनगरपरप्रांतीयांची दादागिरी, संगमनेरकरांना ठरतेय डोकेदुखी

परप्रांतीयांची दादागिरी, संगमनेरकरांना ठरतेय डोकेदुखी

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

संगमनेर शहर व परिसरात गेल्या काही वर्षांपासून परप्रांतीय नागरिकांची संख्या वाढत चाललेली आहे. वेगवेगळ्या व्यवसायावर कब्जा करू पाहणारे परप्रांतीय स्थानिक नागरिकांना मारहाण करून दादागिरी करत आहे. त्यांची वाढती दादागिरी संगमनेरकरांना डोकेदुखी ठरत आहे. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी पोलिसांनी परप्रांतीयांच्या हालचालीकडे लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

- Advertisement -

उत्तर प्रदेश, बिहार, केरळ या राज्यातील हजारो नागरिक संगमनेर शहर व परिसरात झाले आहे. वेगवेगळ्या व्यवसायामध्ये मजूर म्हणून हे नागरिक काम करत आहे. आता यातील अनेकांनी आपली स्वतःची दुकाने थाटली आहे.काही जणांनी रस्त्यावर अतिक्रमण करून आपले व्यवसाय सुरू केले आहेत. अनेक वर्षे गुण्या गोविंदाने वागणारे परप्रांतीय नागरिक आता स्थानिक नागरिकांची वेगवेगळ्या कारणावरून भांडणे करताना दिसत आहे.

संगमनेर शहर व परिसरात यातील अनेकांनी स्वतःची घरे बांधलेली आहे. वेगवेगळ्या प्रभागातील मतदार म्हणून ते महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या परप्रांतीयांना रेशन कार्ड कसे मिळाले? त्यांनी आपले मूळ रेशन कार्ड रद्द केले आहे काय? याची महसूल व पोलिसांकडून फारशी माहिती घेतली जात नसल्याचे दिसत आहे. रेशन कार्ड मुळे हे नागरिक संगमनेर येथील मतदार बनले आहेत. परप्रांतीय मतदारांच्या माध्यमातून राजकीय पक्षांच्या काही पदाधिकार्‍यांनी आपली वोट बँक तयार केली आहे. या पदाधिकार्‍यांचा त्यांना आश्रय मिळत असल्याने अनेक परप्रांतीयांची संगमनेरात दादागिरी वाढलेली आहे.

शहरातील वेगवेगळ्या रस्त्यावर या परप्रांतीय नागरिकांनी आपले दुकाने थाटलेली आहे. या दुकानात वरून अनेकदा भांडणे होतात. तीन दिवसांपूर्वी शहरातील अशोक चौकात अशा भांडणाचे रूपांतर मारामारीत झाले होते. पोलिसांनी संभाव्य धोका ओळखून कार्यवाही करावी अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

संगमनेर शहरातील परप्रांतीयांना मिळालेले रेशन कार्ड, त्यांचा मतदार म्हणून झालेला समावेश संशयास्पद असल्याचा आरोप शहरातून होत आहे. परप्रांतीयांच्या रेशन कार्ड तपासणी बाबत लवकरच आंदोलन होण्याची शक्यता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या