Thursday, April 25, 2024
Homeनगरइतर मागासवर्ग समाजाला अतिरिक्त सवलती

इतर मागासवर्ग समाजाला अतिरिक्त सवलती

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

इतर मागासवर्ग समाजाच्या आरक्षण व आतापर्यंत शासनामार्फत दिल्या जाणार्‍या सवलती व इतर लाभांचा सर्वकषदृष्टीने

- Advertisement -

अभ्यास करून परिणामकारक कार्यान्वयन होण्याच्यादृष्टीने तसेच अतिरिक्त सवलती, लाभ प्रस्तावित करण्याच्यादृष्टीने अभ्यास करून मंत्रिमंडळाला शिफारस करण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांचे अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभागाने याबाबत शासन निर्णय निर्गमित केला आहे. इतर मागासवर्ग समाजाच्या आरक्षण व आतापर्यंत शासनामार्फत दिल्या जाणार्‍या सवलतीचा व इतर लाभांचा सर्वंकषदृष्टीने अभ्यास करून परिणामकारक कार्यान्वयन होण्याच्यादृष्टीने तसेच अतिरिक्त सवलती, लाभ प्रस्तावित करण्याच्यादृष्टीने अभ्यास करून मंत्रिमंडळाला शिफारस करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने दि. 14 ऑक्टोबर 2020 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेतला आहे.

मंत्रिमंडळ उपसमिती अशी…

अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (अध्यक्ष), गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (सदस्य), इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार (सदस्य), वने भुकंप पुनर्वसन मंत्री संजय राठोड (सदस्य), पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील (सदस्य)

तसेच इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे संबंधित सहसचिव/ उपसचिव उपरोक्त मंत्रिमंडळ उपसमितीचे समन्वयक म्हणून काम पाहतील. सदर उपसमिती, इतर मागासवर्ग समाजाच्या आरक्षण व आतापर्यंत शासनामार्फत दिल्या जाणार्‍या सवलतींचा व इतर लाभांचा सर्वंकषदृष्टीने अभ्यास करून परिणामकारक कार्यान्वयन होण्याच्यादृष्टीने तसेच अतिरिक्त सवलती प्रस्तावित करण्याच्यादृष्टीने अभ्यास करून मंत्रिमंडळाला शिफारस करेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या