Thursday, April 25, 2024
HomeमनोरंजनOscar 2021 : ऑस्कर पुरस्कारांची घोषणा, येथे पाहा विजेत्यांची यादी

Oscar 2021 : ऑस्कर पुरस्कारांची घोषणा, येथे पाहा विजेत्यांची यादी

दिल्ली | Delhi

कलाविश्वात अतिशय प्रतिष्ठीत अशा ओळखल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कार सोहळा अमेरिकेतील लॉस एंजेलिस पार पडला आहे. यंदा या पुरस्काराचं ९३ वे वर्ष आहे.

- Advertisement -

या सोहळ्यात एकामागून एक कलाकाविष्कारांचा गौरव झाल्याचे पाहायला मिळाले. दरवर्षी हा पुरस्कार सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. मात्र यंदा करोनामुळं व्हर्चुअल पद्धतीनं सोहळा पार पडला. अभिनेत्री प्रियंका चोपड़ा आणि निक जोनस यांनी काही दिवसांपूर्वी ऑस्कर २०२१ पुरस्कार सोहळ्याची नामांकन जाहीर केली होती.

ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात ‘नोमाडलँड’ (Nomadland) हा चित्रपट सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मानकरी ठरला. तर ‘एंथनी हॉपकिंस’ (Anthony Hopkins) यांना द फादर या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा तर फ्रांसेस मैकडॉर्मेंड (Frances McDormand) यांना नोमाडलैंड सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. अभिनेता डॅनियेल कालूया याने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याच्या पुरस्कारावर नाव कोरलं आहे.

यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात नेटफ्लिक्सने चांगलाच दबदबा प्रस्थापित केल्याचे दिसून आले. तब्बल ३६ नामांकने एकट्या नेटफ्लिक्सकडे होती. यामध्ये डेविड फिन्चरचा ब्लॅक एंड व्हाइट ड्रामा ‘मैनक’चाही समावेश आहे.

‘या’ चित्रपटाने पटकावले तीन पुरस्कार

ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात यंदाचा बेस्ट पिक्चर फिल्मचा पुरस्कार नोमाडलँडला मिळाला आहे. तसेच या सिनेमासाठी चुलू जौ हिने बेस्ट डायरेक्टराचा ऑस्कर पटकावला आहे आणि याच चित्रपटासाठी अभिनेत्री फ्रांसेस मॅकडॉर्मेंड हिला बेस्ट अ‍ॅक्ट्रेसच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.

ऑस्कर २०२१ विजेत्यांची यादी

सर्वोत्कृष्ट चित्रपट- नोमाडलँड

सर्वोत्कृष्ट अभिनेता- अँथनी हॉपकिन्स (द फादर)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- फ्रान्सेस मॅकडॉर्मंड (नोमाडलँड)

सर्वोत्कृष्ट गीत- फाईट फॉर यू (जुडस अँड द ब्लॅक मसिहा)

सर्वोत्कृष्ट संगीत- सोल

सर्वोत्कृष्ट चित्रपट एडिटिंग – साऊंड ऑफ मेटल (मिकेल ई. जी. निल्सेन)

सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी- मँक

सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाइन- मँक

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- युह जंग युन (मिनारी)

सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स- टिनेट

सर्वोत्कृष्ट माहितीपट (फिचर)- माय ऑक्टोपस टिचर

सर्वोत्कृष्ट माहितीपट (शॉर्ट सब्जेक्ट)- कोलेट

सर्वोत्कृष्ट अँनिमेटेड चित्रपट- सोल

सर्वोत्कृष्ट अँनिमेटेड लघुपट- इफ एनिथिंग हॅपन्स आय लव्ह यू

सर्वोत्कृष्ट लाइव्ह ॲक्शन लघुपट – टू डिस्टंट स्ट्रेंजर्स

सर्वोत्कृष्ट ध्वनी – साऊंड ऑफ मेटल

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन- नोमाडलँड (क्लोई शाओ)

सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझाइन- मा रेनेस ब्लॅक बॉटम (एन रोथ)

सर्वोत्कृष्ट मेकअप अँड हेअरस्टायलिंग – मा रेनेस ब्लॅक बॉटम (सर्जिओ लोपेझ-रिव्हेरा, मिया निलँड, जामिका विल्सन)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – डॅनिअल कलुया (जुडस अँड द ब्लॅक मसिहा)

सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट – अनदर राऊंड (डेन्मार्क)

सर्वोत्कृष्ट अडाप्टेड स्क्रीनप्ले – द फादर

सर्वोत्कृष्ट ओरिजिनल स्क्रीनप्ले – प्रॉमिसिंग यंग वुमन (एमराल्ड फेनेल)

दरम्यान ऑस्कर 2021 पुरस्कार सोहळ्यात दिवंगत बॉलिवूड अभिनेता इरफान खान ज्याने हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाच्या छाप सोडली त्याच्यासह सुशांत सिंह राजपूत, ऋषी कपूर, भानू अथिया आणि अनेक दिवंगत स्टार्संना श्रद्धांजली वाहिली.

दरम्यान ऑस्कर 2021 पुरस्कार सोहळ्यात दिवंगत अभिनेते इरफान खान यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला आहे. तसेच सुशांत सिंह राजपूत, ऋषी कपूर, भानू अथिया आणि अनेक दिवंगत स्टार्संना श्रद्धांजली वाहिली.

अभिनेत्री फ्रीडा पिंटोने इरफान खान यांच्या आठवणीला उजाळा दिला आहे. ‘इरफान खान यांच्यासारखं कुणीच नव्हतं. इरफान खान यांच्यासारखं कोणीच नव्हतं. त्यांचा अभिनय, व्यक्तिमत्व पाहून केवळ कौतुकच वाटलं नाही तर मलाही त्यांचं अनुकरण करण्याची इच्छा आहे’ असे फ्रीडा म्हणाली. तसेच इरफान यांचे ‘पानसिंग तोमर’, ‘लंच बॉक्स’, ‘मकबूल’ हे चित्रपट तिच्या हृदयाजवळ असल्याचे तिने म्हटले आहे.

एन रोथ यांनी ऑस्कर पुरस्कार मिळवून रचला इतिहास

मा रैनीच्या ब्लॅक बॉटमला दोन ऑस्कर पुरस्कार मिळाले आहेत. मा रैनीचा ब्लॅक बॉटमला बेस्ट कॉश्च्युम डिझाइनचा पुसस्कार एन रोथ यांना पुरस्कार मिळाला. एन रोथ यांनी हा पुरस्कार प्राप्त करत इतिहास बनवला आहे. त्यांना वयाच्या ८९व्या वर्षी ऑस्कर मिळाला आहे. इतक्या जास्त वयात ऑस्कर मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या