Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याकरोनात अनाथ झालेल्यांना मिळणार पालक

करोनात अनाथ झालेल्यांना मिळणार पालक

नाशिक । प्रतिनिधी Nashik

हरवले आभाळ ज्यांचे हो तयांचा सोबती; सापडेना वाट ज्यांना हो तयांचा सारथी.. या गाण्यातील ओळी सत्यात उतरविण्याचे काम जिल्ह्यातील महसूल अधिकारी ( District Revenue Officers )करत आहेत. जिल्हाधिकारी सुरज मांढरे ( Collector Suraj Mandhare )यांच्या संकल्पनेतून करोनामुळे ( Corona ) ज्यांनी आपले आई वडील गमावले अशा लहान बालकांना महसूल अधिकारी दत्तक ( Adopt ) घेणार आहेत. अनाथ झालेल्या या मुलांना (orphaned childrens )आपल्या पायावर उभे राहण्यापर्यंत संबंधित अधिकारी मदत करणार आहेत.

- Advertisement -

गेल्या दोन वर्षापासून जगासह देशावर करोनाचे संकट आहे. जिल्ह्यात देखील आतापर्यंत पावणे पाच लाख रुग्ण करोनाने बाधित झाले असून यापैकी साधारण 8 हजार 886 रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

जिल्ह्यातील 40 कुटुंबातील 56 मुलांचे पालक करोनामुळे गतप्राण झाले आहेत. अशा अनाथ झालेल्या बालकांसाठी योजना आखल्या आहेत. त्याची अंमलबजावणी देखील जिल्ह्यात सुरु आहे. त्यातच जिल्ह्यात मिशन वात्सल्य अंतर्गत 46 योजना एकाच छताखाली आणण्यात आल्या आहेत. अनाथ बालकांना पाच लाख रुपये प्रत्येकी मदत करण्याचे देखील योजनांमध्ये नमूद आहे. तसेच या मुलांना दरमहा 1100 रुपये शैक्षणिक शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.

दरम्यान, त्यातून मुलांना रक्कम मिळते का? ही मुले पुढील आयुष्य कसे जगणार ? काही अनाथ बालके आजी आजोबा तर काही बालके मामा काका यांच्याकडे वास्तव्याला आहेत. त्यांना एकटेपणा वाटायला नको त्यामुळे प्रत्येक अधिकार्‍याने जबाबदारी घेण्याचे ठरविण्यात आले आहे.

महसूल विभागातील जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, मुख्यालयातील काही उपजिल्हाधिकारी, काही तहसीलदार तर तालुक्यातील प्रत्येक प्रांत आणि प्रत्येक तहसीलदार अशा एकूण 40 महसूल अधिकार्‍यांनी अनाथांची जबाबदारी ऐच्छिकरित्या स्वीकारली आहे. या जबाबदारी घेताना अधिकार्‍यांनी नावानिशी जबाबदारी घेतली आहे. म्हणजेच भविष्यात अधिकार्‍यांची सेवा बजावताना बदली जरी झाली तरी ते स्वतः या मुलांवर लक्ष ठेवणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या