Wednesday, April 24, 2024
Homeनाशिककरोना महामारीने अनाथ झालेल्यांना आधाराची गरज

करोना महामारीने अनाथ झालेल्यांना आधाराची गरज

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

करोना ( Corona ) महामारीचा मुकाबला आज प्रत्येक जण करत आहे. या महामारीत ज्या कुटुंबांतील कर्ता व्यक्ती मयत झाला आहे अशा कुटुंबांना आज मदतीची गरज आहे. ज्या कुटुंबातील आई व वडील दोघेही मयत झाले आहेत अशा कुटुंबातील अनाथ बालकांसाठी ( Orphan Childrens ) शासनाकडून सर्वतोपरी मदत करण्यात येत आहे. या आर्थिक संकटातील कुटुंबांना मदतीचा हात देण्यासाठी सेवाभावी संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन कृषी मंत्री दादा भुसे ( Agriculture Minister Dada Bhuse )यांनी केले.

- Advertisement -

टाटा रॅलीज इंडिया लि ( Tata Rally India Ltd. )., धान्या सीडस् यांच्या सौजन्याने सामाजिक दायित्व निधीतून जीवनावश्यक घरगुती किराणा साहित्याचे कृषिमंत्री भुसे यांच्या हस्ते गोरगरिबांना वाटप करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

याप्रसंगी संजय दुसाणे, प्रमोद शुक्ला, अनिल पवार, रॅलीज इंडिया कंपनीचे माणिक देशमुख, डिगंबर बच्छाव, स्वप्नील केले, नानासाहेब आंधळे, सचिन पगार, अनिल निकम, दीपक मालपुरे, बालचंद छाजेड आदी उपस्थित होते.

करोना प्रादुर्भावामुळे एक किंवा दोन्ही पालक गमावल्याने जी बालके अनाथ झाली आहेत अशा बालकांच्या पुनर्वसन व सर्वांगीण विकासासाठी शासन प्रयत्नशील आहे. घरातील कर्ता व्यक्ती करोनाने मयत झाल्यामुळे आर्थिक अडचणीतील कुटुंंबांना मदतीचा हात देण्यासाठी विविध सामाजिक संस्थांनी सामाजिक दायित्व निधीतून मदतीसाठी पुढे येऊन समाजकार्यास हातभार लावण्याची आज गरज असल्याचे भुसे यांनी सांगितले.

यावेळी साखर, तेल, तांदूळ, डाळी, मसाल्यासह किराण्यातील जीवनावश्यक 13 वस्तूंंचा समावेश असलेल्या सुमारे 500 किटस्चे वितरण यावेळी गोरगरीब लाभार्थींना करण्यात आले. मिनी आय.सी.यू.ची सेवा देणारी आधुनिक पद्धतीची अ‍ॅम्ब्युलन्स सेवा मालेगावकरांसाठी उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे भुसे यांनी सांगितले.

महामारीचा मुकाबला करण्यासाठी मालेगाव प्रशासनामार्फत चांगले काम झाले असून यापुढे अशा सकंटांचा मुकाबला करण्यासाठी आपण सज्ज आहोत. बी साईड यू कंपनीच्या आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या अ‍ॅम्ब्युलन्ससेवा रुग्णांना नक्कीच दिलासा देतील, असा विश्वासही त्यांनी शेवटी बोलताना व्यक्त केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या