पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजन

jalgaon-digital
1 Min Read

सातपूर l Satpur (प्रतिनिधी)

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नाशिक यांचेमार्फत दि. २२ ते २६ फेब्रुवारी २०२१ दरम्यान ऑनलाईन पध्दतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यालयाकडील नोंदणीकृत उमेदवारांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात सहाय्य होण्याच्या दृष्टीने सदर ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजन केला असून यामधील मुलाखती मोबाईल, दूरध्वनी, व्हिडीओ कॉन्फरन्स, स्काईप, वॉटसअ‍ॅपव्दारे घेण्याचे नियोजित करण्यात आलेले आहे.

शासनाने जाहीर केलेल्या अनलॉकनंतर काही औद्योगिक आस्थापनांना मनुष्यबळाची आणि स्थानिक बेरोजगार उमेदवारांना कामाची आवश्यकता असल्याचे जाणवत आहे. यामुळे नियोक्ते आणि नोकरी मागणार्‍या उमेदवार यांना एकछत्राखाली सुविधा उपलब्ध होण्याकरीता ऑनलाईन रोजगार मेळावा महास्वयंम वेबपोर्टलवरून दि. 22 ते 26 फेब्रुवारी 2021 दरम्यान पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्याचा जास्तीत जास्त भरती इच्छुक नियोक्ते आणि बेरोजगार उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने लाभ घ्यावा असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या सहायक आयुक्त अ.ला. तडवी यांनी केले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *