Friday, April 26, 2024
Homeनाशिकरोटरी क्लबतर्फे रविवारी ऑरगॅनिक बाजार

रोटरी क्लबतर्फे रविवारी ऑरगॅनिक बाजार

नाशिक । Nashik
रोटरी क्लब ऑफ नाशिकच्यावतीने रविवारी (दि. १३) गंगापूररोडवरील शंकराचार्य न्याससंकुल पार्किंगमध्ये नाशिककरांसाठी सकाळी ९ ते दुपारी १२ या कालावधीत ऑरगॅनिक (सेंद्रिय) भाजीपाला, फळे, रानभाज्या आणि धान्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

हा ऑरगॅनिक भाजीपाला पेठ, चांदवड, त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी येथील शेतकरी समूहांच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आलेला असून सर्व नाशिककरांसाठी खुला राहणार आहे.

- Advertisement -

शेतकऱ्यांचा ऑरगॅनिक पद्धतीने उत्पादित स्वच्छ, ताज्या पालेभाज्या, वेलवर्गीय भाज्या, फळे, विदेशी भाज्या थेट कमीतकमी हाताळणी करून ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. हा भाजीपाला संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने जैविक घटकांचा वापर करून हानिकारक रसायन विरहीत उत्पादित व प्रमाणित केलेला असणार आहे.

आजच्या बाजारात पेठ तालुक्यातील आदिवासी शेतकरी रानभाज्या, तांदूळ आणि कडधान्ये विक्रीस असणार आहेत. याशिवाय ग्रामीण शेतकरी महिला, बचतगटांनी तयार केलेली घरगुती पद्धतीचे आरोग्यवर्धक आलेपाक, मसाले, सुकविलेल्या भाज्या, लाकडी घाण्याचे शेंग, खोबरे, बदाम, तीळ, मोहरी, करडई, सूर्यफुल, खुरासणी, सूर्यफुल, एरंडतेले, हातसडी तांदूळ, सेंद्रिय गुळ ही उत्पादनेदेखील या बाजारात उपलब्ध होणार आहेत.

कोविडच्या पार्श्वभूमीवर योग्य ती काळजी घेण्यात आलेली असून, नाशिककरांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन रोटरी क्लबचे अध्यक्ष मुग्धा लेले, सचिव विजय दिनानी, प्रफुल बरडिया, कम्युनिटी सर्व्हिस संचालक हेमराज राजपूत, जनसंपर्क संचालक संतोष साबळे आणि रोटरी बाजार समन्वयक रफिक व्होरा, तुषार उगले यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या