Wednesday, May 8, 2024
Homeमुख्य बातम्याजनावरांशिवाय सेंद्रीय शेती अशक्य

जनावरांशिवाय सेंद्रीय शेती अशक्य

नांदगाव । प्रतिनिधी Nandgaon

मी गेल्या सात-आठ वर्षांपासून सेंद्रिय शेती करतो. सेंद्रिय शेती (Organic farming)करत असताना सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपली जमीन वाचवणे महत्त्वाचे आहे. रासायनिक खते, रासायनिक औषधे, रासायनिक बुरशीनाशके वापरतो. त्याच्यामुळे सुक्ष्म सजीवांना हानी पोहचते. त्याहीपेक्षा सगळ्यात जास्त हानी आपल्या स्वतःच्या जमिनीला पोहोचते.

- Advertisement -

परिणामी जमिनीची उत्पादन क्षमता कमी होते. पण मी गेल्या सात-आठ वर्षांपासून सेंद्रिय शेती करतो. त्यामध्ये प्रामुख्याने डाळिंब, शेवगा, मका आणि चारा पीक घेतो. यावर्षी शेवग्यासाठी कोणतेही खत न वापरताही भरघोस उत्पन्न मिळाले आहे. जमिनीचा कस सुधारण्यासाठी ताजे शेण पाण्यातून सोडतो. त्याच्यामुळे जमिनीत जिवाणू संख्या वाढते. जनावरांशिवाय सेंद्रीय शेती अशक्य आहे. सेंद्रीय शेतीसाठी शेतकर्‍यांकडे जनावरे असणे गरजेचे आहे. त्यांच्याशिवाय सेंद्रिय शेती करणे अशक्य आहे.

राजेश गंगाधरराव पाटील (अमोदे) ता. नांदगाव

माती परीक्षण तालुक्याला व्हावे!

तालुक्यात सुजाण शेतकरी आहेत. परंतु माती परीक्षण ( Soil Testing ) करण्यासाठी नांदगाव मध्ये कुठल्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे शेतकरी माती परीक्षण करत नाही. माती परीक्षणासाठी लोकांना नाशिक येथे जाण्याची वेळ येऊ नये. तालुक्यामध्ये माती परीक्षण केंद्राची निर्मिती केली तर त्याचा फायदा तालुक्यातील शेतकर्‍यांना होईल. तसेच शेतकर्‍यांचा वेळ आणि खर्चही वाचेल. माती परीक्षण केले की कोणत्या प्रकारचे खत वापरायचे हे शेतकर्‍यांच्या लक्षात येईल. आणि त्याचा फायदा मातीचा दर्जा राखण्यासाठी नक्की होईल.

भगवान पाटील पिंजारवाडी (मांडवड ) ता.नांदगाव

माती महत्वाची

शेतीसाठी माती खूप महत्त्वाची . माती योग्य प्रकारे सुपिक व्हावी यासाठी शेतकर्‍यांनी जास्तीत जास्त सेंद्रिय खतांचा वापर करावा. शेतीचे उत्पन्न भरघोस होऊ शकते. रासायनिक खतांमुळे जास्तीत जास्त तोटे वाढतच चालले आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांना सेंद्रिय शेतीकडे वळणे गरजेचे आहे. याविषयी शेतकर्‍यांमध्ये जनजागृती झाली पाहिजे.

सागर विठ्ठल आहेर, (मांडवड) ता.नांदगाव.

सेंद्रिय शेतीसाठी मार्गदर्शन मिळावे

शेतीमध्ये उगवण शक्ती कमी झाली आहे. ती टिकवण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर वाढला पाहिजे. त्यासाठी शेतकर्‍यांना सेंद्रिय शेतीसाठी मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे. शेतीची उगवण शक्ती टिकवण्यासाठी शेतकर्‍यांना माती परीक्षण करणे गरजेचे आहे..

रामनिवास बाळ क़लंत्री, माजी संचालक कृउबा, नांदगाव.

मातीचा कस सुधारणे गरजेचे

काळी कसदार किंवा मध्यम स्वरुपाची जमीन असेल तर तिचे माती परीक्षण करून तिचा कस कसा सुधारेल याचा विचार केला पाहिजे. सेंद्रिय खत, शेणखत, पोल्ट्री खतांचा वापर करून शेतीचा कस सुधार शकतो. माती परीक्षणासाठी शेतकर्‍यांना नाशिक येथे जावे लागते. त्यामुळे काही शेतकरी कंटाळा करतात. ते केंद्र नांदगात तालुक्यातच आकाराला आले तर शेतकर्‍यांना त्याचा चांगलाच फायदा होईल.

उदय ओंंकार पाटील, प्रगतशील शेतकरी, आझादनगर,नांदगाव.

- Advertisment -

ताज्या बातम्या