Tuesday, April 23, 2024
Homeनाशिकबंद असलेले शस्त्रक्रियागृह सुरू करण्याचे आदेश

बंद असलेले शस्त्रक्रियागृह सुरू करण्याचे आदेश

लासलगाव। वार्ताहर Lasalgon

लासलगाव ग्रामीण रुग्णालय ( Lasalgaon Rural Hospital ) स्लॅब गळतीमुळे गेल्या चार महिन्यापासून ऑपेरेशन थिएटर( Operation Theater ) बंद आहे. त्यामुळे सीझरची शक्यता असलेल्या पेशंटची कुचंबना होत आहे. रुग्णालय रस्त्यावर मोठे मोठे खड्डे असल्याने रुग्णांना त्रास होत आहे. या समस्येची माहिती भाजपच्या सुवर्णा जगताप यांनी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या दिशा समितीच्या बैठकीत मांडली.

- Advertisement -

तत्काळ 15 दिवसांत ऑपरेशन थिएटर चालू करण्यास केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डॉ.भारती पवार यांनी आरोग्य प्रशासनास सांगितले. तसेच बांधकाम अधिकार्‍यांना तत्काळ या ठिकाणी असलेले खड्डे बुजविण्याचे आदेश दिले आहे.विभागीय आयुक्त कार्यालयाच्या नियोजन सभागृहात दिशा समितीच्या बैठकीत डॉ.भारती पवार, जिल्हाधिकारी गंगाधरण डी, जि.प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, आनंद पिंगळे, डॉ.अशोक थोरात, डॉ.कपिल आहेर, विवेक सोनवणे आदी अधिकारी उपस्थित होते.

यावेळी सुवर्णा जगताप यांनी लासलगाव येथील पाणी पुरावठ्याचा भीषण प्रश्न, लासलगाव रुग्णालयातील बंद ऑपरेशन थिएटर, रक्त संकलन आणि शवविच्छेदन व्यवस्था लवकरात लवकर चालू करण्याची विनंती केली. तसेच तालुक्यातील आशा सेविकांचे रखडलेले मानधन, पगार तसेच कोटमगाव पुलाखाली आलेल्या पाण्यामुळे वाहतुकीची समस्या आणि खेरवाडी पुलालगतच्या रस्त्याचा प्रश्न मांडला. यावर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश ना.डॉ.भारती पवार यांनी संबंधितांना दिले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या