Saturday, April 27, 2024
Homeनगरसाथरोग टाळण्यासाठी शहरात औषध फवारणीचे आदेश

साथरोग टाळण्यासाठी शहरात औषध फवारणीचे आदेश

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहर (City), उपनगरातील साथ रोग (disease)आटोक्यात आणण्यासाठी प्रत्येक प्रभागामध्ये औषध फवारणी, फॉगिंग मशिनद्वारे धूर फवारणी करण्याचे आदेश महापौर रोहिणी शेंडगे (Mayor Rohini Shendge) यांनी प्रशासनाला दिले आहेत. पावसाचे प्रमाण वाढल्यामुळे व हवामानात बदल (Climate change) झाल्यामुळे शहर व उपनगरात साथ रोगांचे रूग्ण वाढले आहेत.

- Advertisement -

यावर उपाय योजना बाबत मलेरिया विभागाची बैठक (Malaria Department Meeting) महापौर शेंडगे यांनी घेतली. यावेळी स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले, सभागृह नेता अशोक बडे, महिला बाल कल्याण समितीच्या सभापती पुष्पा बोरूडे, नगरसेवक अमोल येवले उपस्थित होते.

साथ रोग आटोक्यात आणण्यासाठी प्रत्येक प्रभागामध्ये औषध फवारणी (Drug spraying), फॉगिंग मशिनद्वारे (Fogging machine) धूर फवारणी (Smoke spraying) करण्याचे आदेश महापौर यांनी दिले. शहर व उपनगरात प्रत्येक प्रभागामध्ये नागरिकांची तपासणी करण्यात यावी. नागरिकांनी देखील आपला परिसर स्वच्छ ठेवावा. पावसाचे पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. पाण्याची टाकी आठ दिवसातून एकदा स्वच्छ धुवून घ्यावी. साथ रोग डासांमुळे होत असल्यामुळे डास होवू नये यासाठी काळजी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या