Thursday, April 25, 2024
Homeनंदुरबारविरोधी पक्षनेते अजित पवार नंदुरबारात

विरोधी पक्षनेते अजित पवार नंदुरबारात

नंदुरबार । प्रतिनिधी nandurbar

राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे उद्या दि. 15 जून रोजी नंदुरबार जिल्हा दौर्‍यावर येत असून त्यांच्या उपस्थितीत नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे यांनी दिली.

- Advertisement -

ना.अजित पवार यांचे उद्या दि. 15 रोजी सकाळी 8.23 ला नंदुरबारात आगमन होईल. त्यानंतर शासकीय विश्राम गृहावर मोटारीने जातील. दुपारी 1 वाजता व्ही.जी.लॉन्स येथे आगमन व त्याच ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मेळावा होणार आहे. दुपारी 4.30 वाजता त्यांचे डॉ.अभिजीत मोरे यांच्या निवासस्थानी आगमन होईल. 5.20 वाजता मोटारीने दोंडाईचाकडे प्रयाण असे जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे कळविण्यात आले आहे.

याबाबत जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, विरोध पक्षनेेते ना.पवार हे उद्या दि.15 रोजी नंदुरबार जिल्हा दौर्‍यावर येत असून दुपारी 12 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत सदर मेळावा व्ही. जी. राजपूत लॉन्स येथे आयोजित करण्यात आला आहे.

या मेळाव्याला राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा निरीक्षक नाना महाले व जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे यांनी केले आहे. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील हे नवापूर येथे एका खासगी संस्थेच्या कार्यक्रमास उपस्थित राहणार असून तर त्यानंतर ते सरपंच व पोलीस पाटील मेळाव्याला संबोधित करणार आहेत. दोनही नेते नंदुरबार जिल्ह्याचा दौरा आटोपून सायंकाळी 5 वाजता दोंडाईचा येथे ज्ञानेश्वर भामरे यांच्या पक्ष प्रवेश सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत, अ

- Advertisment -

ताज्या बातम्या