Thursday, April 25, 2024
Homeजळगावशिक्षक बदल्यावरुन जि.प.ची सभा वादळी

शिक्षक बदल्यावरुन जि.प.ची सभा वादळी

जळगाव – Jalgaon

जिल्हा परिषदेच्या ऑनलाईन सभेत शिक्षक ऑनलाईन बदलीसह विविध बदल्यांचा विषयावर सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरुन सोमवारी सर्वसाधारण सभेत वादळी चर्चा रंगली. त्यावरून विरोधक व सत्ताधार्‍यांमध्ये कलगीतुरा चांगलाच रंगला.

- Advertisement -

जिल्हा परिषद अध्यक्षा ना. रंजना पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. जि.प.उपाध्यक्ष लालचंद पाटील, शिक्षण सभापती रवींद्र पाटील, समाजकल्याण सभापती जयपाल बोदडे, माजी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, माजी सभापती पोपट भोळे, राष्ट्रवादीचे गटनेते शशिकांत साळुंखे, शिवसेना सदस्य नानाभाऊ महाजन, भाजपचे सदस्य मधुकर काटे, सीईओ डॉ.बी.एन.पाटील, अतिरीक्त सीईओ विनोद गायकवाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे यांच्यासह सदस्य, सभापती आणि सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

या ऑनलाइन सभेत प्रत्येक विषयावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. यात किन्ही येथील ग्रामसेविका दहा वर्ष झाल्याने बदलीस पात्र होत्या. त्यांची बदली होणार होती. मात्र, त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांकडून थेट बनावट प्रमाणपत्र व तेही थेट बदलीच्या दिवशीच सादर करून बदली रद्द केली. जिल्हा परिषद प्रशासनानेही ते मान्य कसे केले असा सवाल जिल्हा परिषद सदस्या पल्लवी सावकारे यांनी उपस्थित केला.

या महिला कर्मचारी एकही दिवस सुटीवर नव्हत्या. मग आजारी कशा, त्यांच्या ईजीसी रिपोर्टवर कोणाचे नाव नाही, ऐवढी मोठी आरोग्याची समस्या नसताना त्या घरी का थांबल्या नाहीत. शिवाय अधिकार्‍यांनी कागदपत्रांची कोणतीही तपासणी न करता त्यावर स्वाक्षर्‍या कशा केल्या. असा प्रश्न त्यांनी उपस्थित करून अधिकार्‍यांना धारेवर धरले. दरम्यान, जि.प.बदली प्रक्रियेतील मोठा घोळ समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या