Friday, April 26, 2024
HomeUncategorizedOppo A15s होणार भारतात लवकरच लॉन्च; काय आहेत वैशिष्ट्ये?

Oppo A15s होणार भारतात लवकरच लॉन्च; काय आहेत वैशिष्ट्ये?

नाशिक | प्रतिनिधी

Oppo A15s चे प्रमोशनल पोस्टर ऑनलाइन प्रसिद्ध झाले आहे. ज्याच्या माध्यमातून फोनचे स्पेसिफिकेशन्स व डिज़ाइनची माहिती प्राप्त झाली आहे.

- Advertisement -

या पोस्टरच्या माध्यमातून ओप्पोच्या नव्या फोनची किंमतदेखील समोर आली आहे. 11 हजार 499 रुपये अशी या फोनची किंमत आहे. ओप्पो ए15एस स्मार्टफोन Oppo A15 चे अपडेटेड व्हर्जन असून ऑक्टोबर मध्ये सादर करण्यात आले होते. ओप्पो ए15 च्या 2 जीबी रम या फोनची किंमत भारतात 8 हजार 990 रुपये आहे. तर 3 जीबी रॅम असलेला स्मार्टफोन 9 हजार 990 मध्ये विक्री झाला.

Mysmartprice च्या एका अहवालानुसार, लिक झालेल्या प्रमोशनल पोस्टर दाखविण्यात आले आहे. या चित्राच्या खाली Oppo A15s ची किंमत 11 हजार 499 रुपये असेल. ही किंमत 4 जीबी रॅम + 64 जीबी

स्टोरेज असलेला फोन असेल. याआधीच लिक झालेल्या पोस्टरमध्ये किंमतीचा उल्लेख नव्हता. कंपनीकडून याआधी Oppo A15 स्मार्टफोनला भारतात विक्रीसाठी 10 हजार 990 रुपये किंमत ठेवून लॉन्च करण्यात आले होते. यात 3 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज असलेला हा फोन असल्याचे बोलले जात होते.

ही आहेत वैशिष्ट्ये

हा फोन घेतल्यास कॅशबॅक आणि नो-कॉस्ट ईएमआय सारख्या ऑफर ग्राहकांना मिळतील

स्लिम बॉडी सोबतच वर्गाकार कॅमेरा मॉड्यूल मिळेल

LED फ्लॅश सोबतच ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप

फोनच्या मागील हिस्स्यावर रियर माउंटेड फिंगरप्रिंट स्कनर आहे

ओप्पो ए15एस फोनमध्ये 6.52 इंच एचडी+ डिस्प्ले असेल

- Advertisment -

ताज्या बातम्या