Friday, April 26, 2024
Homeराजकीयविधान परिषदेच्या निकालामुळे ‘ऑपरेशन लोटस’ थंडावणार!

विधान परिषदेच्या निकालामुळे ‘ऑपरेशन लोटस’ थंडावणार!

नाशिक । कुंदन राजपूत Nashik

विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने विजयाचा गुलाल उधळला असून भाजपचे कमळ कोमजले आहे. विधान परिषद निवडणुकीच्या जागा भाजपच्या पारडयात पडल्या असत्या तर राज्यात मऑपरेशन लोटसची जोरदार तयारी सुरु झाली असती अशी चर्चा होती.

- Advertisement -

मात्र, सहापैकी चार जागा जिंकत महाविकास आघाडीने भाजपचा धुव्वा उडवला. त्यामुळे भाजपकडून आता चिंतनाची भाषा केली जात असून ङ्गरेशीम बागेफच्या अंगणातील गडाला लागलेला सुरुंग भाजपच्या जिव्हारी लागला आहे. ते बघता भाजपकडून पुढिल काही दिवस उठसूठ महाविकास आघाडीवर केला जाणारा तोफेचा मारा थंडवणार अशी शक्यता आहे.

बिहार निवडणुकीच्या निकालानंतर व त्यातही प्रभारी म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या यशामुळे राज्यातील भाजप नेते हे सरकार दोन महिन्यात कोसळेल असे भाकित वर्तवित होते.महाविकास आघाडीच्या वर्षपुर्तीनिमित्त हे सरकार कसे अपयशी ठरले हे सांगण्याचा सपाटाच भाजपने लावला होता.

विधान परिषदेच्या सहापैकी पाच जागा भाजप आरामात खिशात टाकेल असा सर्वांचा व्होरा होता. त्यामुळे भाजपने निकालानंतर ऑपरेशन लोटसचा मुहूर्त निवडल्याची जोरदार चर्चा होती. त्यातही मुळचे भाजपचे नसलेले मात्र इतर पक्षातून आलेले नेते लवकरच राज्यात सत्तांंतर होऊन भाजपचे सरकार येईल अशी रोज सकाळी उठून बांंग देत होते. त्यामुळे विधानपरिषदेच्या निकालाकडे राज्याचे लक्ष लागून होते.

पण सहापैकी चार जागांवर महाविकास आघाडिने विजयाचे फटाके फोडले. तर भाजपला धुळे व नंदूरबारची एकमेव जागा मिळाली. त्यातही पन्नास वर्षापासुनचा गड असलेला व गंगाधर फडणवीस, नितीन गडकरी यांनी प्रतिनिधित्व केलेल्या नागपूर पदवीधरच्या गडाला कॉग्रेसने सुरुंग लावला.

रेशीम बागेच्या अंगणातील या पराभवाने भाजप नेत्यांची बोलती बंद झाली. तर पुणे पदवीधरचा भाजपचा गड राष्ट्रवादीने खेचून आणला. वर्षपुर्तीनंतर या जनमताच्या कौलमुळे महाविकास आघाडीचे हौसले बुलंद झाले आहेत. हे सरकार पाच वर्ष नव्हे तर 25 वर्ष चालेल असा टोला त्यांनी भाजपला लगावला.

तर पराभवानंतर भाजप नेत्यांकडून चिंतन, मननची भाषा सुरु आहे. आता आगामी महापालिका निवडणुकानंतरच भाजपकडून मऑपरेशन लोटसफ चे प्रयोग केले जातील अशी शक्यता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या