Thursday, April 25, 2024
Homeक्रीडामुक्त विद्यापीठ केंद्रीय क्रीडा महोत्सवाचा समारोप

मुक्त विद्यापीठ केंद्रीय क्रीडा महोत्सवाचा समारोप

नाशिक । प्रतिनिधी Nashik

क्रीडा स्पर्धांमधून (sporting events) व्यक्तिमत्त्व विकासासोबतच परस्पर बंधुभाव आणि सलोखाही वाढतो. विद्यापीठ केवळ पुस्तकी शिक्षण देऊन थांबत नाही, तर मैदानी खेळाद्वारे विद्यार्थ्यांची जडण घडण करत असते. म्हणूनच अशा स्पर्धा या आत्मविश्वास विकसित करणार्‍या असतात, असे प्रतिपादन महाराष्ट्र पोलीस अकादमीचे उपसंचालक शिवाजीराव पवार यांनी केले.

- Advertisement -

येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ ( YCMOU )प्रांगणातील क्रीडांगणावर आयोजित विद्यापीठाच्या दोन दिवशीय क्रीडा महोत्सवाच्या समारोपप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रकाश देशमुख होते. या महोत्सवात कोल्हापूर विभागाच्या संघाने सर्वाधिक क्रीडा प्रकारात अव्वल राहून सर्वसाधारण विजेतेपद पटकावले.

व्यासपीठावर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रकाश देशमुख, वित्त अधिकारी गोविंद कतलाकुटे, विद्यार्थी कल्याण केंद्राच्या संचालिका प्रा. डॉ. विजया पाटील, क्रीडा संयोजक सुनील साळुंके उपस्थित होते. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या औरंगाबाद, अमरावती, मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूर, नांदेड व नाशिक आठ विभागीय केंद्रांतर्गत पुरुष गटात 339 व महिला गटातून 86 असे 425 खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेतून निवड झालेले खेळाडू औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात होणार्‍या राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवात सहभागी होणार असल्याने यावेळी या क्रीडा महोत्सवासाठी मुक्त विद्यापीठाचे विविध क्रीडा प्रकारातील संघ निश्चित करण्यात आले.

डॉ. विजया पाटील यांनी प्रास्ताविक केले. डॉ. बी. बी. पेखळे व सौ. माधुरी देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.

स्पर्धेचा निकाल

* व्हॉलीबॉल – विजेता संघ (पुरुष) नांदेड विभाग, उपविजेता संघ नागपूर विभाग, खो खो (पुरुष) – विजेता संघ कोल्हापूर विभाग, उपविजेता – औरंगाबाद विभाग. कबड्डी (पुरुष) विजेता संघ कोल्हापूर विभाग, उपविजेता संघ नाशिक विभाग. कबड्डी (महिला) विजेता संघ कोल्हापूर विभाग, उपविजेता संघ मुंबई विभाग. * 400 बाय 4 रिले (पुरुष) विजेता संघ – नाशिक विभाग, उपविजेता संघ अमरावती विभाग. * 400 मीटर धावणे (पुरुष) प्रथम अभिजित हिरकुडे (नाशिक), द्वितीय मंगेश गुथे (नांदेड) व तृतीय अनिकेत पाटील (कोल्हापूर). * 400 मीटर धावणे (महिला) प्रथम सेजल पराड (मुंबई), द्वितीय मयुरी वानखेडे (नागपूर), तृतीय रामगुंजना रामकृष्ण (मुंबई) * 1500 मीटर धावणे (पुरुष) – प्रथम तुलसीदास निकुंभ (नाशिक), द्वितीय सुरज घोगरे (पुणे), तृतीय रामभाऊ केदार (औरंगाबाद). * 1500 मीटर धावणे (महिला) प्रथम योगिता साळुंके (औरंगाबाद), द्वितीय अक्षिता बोबा (मुंबई). * 100 मीटर धावणे (पुरुष) प्रथम अनिरुद्ध जाबुडकर (नागपूर), द्वितीय चेतन न्याहारडे (नाशिक), तृतीय अतुल रोकडे (नागपूर). महिला गटात – प्रथम अंजुम शेख (नागपूर), द्वितीय सिम्पल चव्हाण (अमरावती), तृतीय सेजल पवार (मुंबई). * 100 बाय 4 रिले (पुरुष) विजेता संघ – नागपूर विभाग व उपविजेता संघ – नाशिक. * 100 बाय 4 रिले (महिला) विजेता संघ – नागपूर विभाग व उपविजेता संघ – अमरावती.

- Advertisment -

ताज्या बातम्या