नगरच्या डॉक्टरांसाठी ओपन थिएटर

jalgaon-digital
2 Min Read

अहमदनगर | ahmednagar –

आय.एम.ए.भवनातील दुसर्‍या टप्यातील ओपन थिएटरचे खुले करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी थिएटरचे उद्घाटन केले.

नगरच्या नेप्ती रस्त्यावर इंडियन मेडिकल असोसिएशनचे ( Indian Medical Association) भवन आहे. येथे दुसर्‍या टप्यातील ओपन थिएटरची open theater निर्मिती करण्यात आली. डॉ एस.एस.दीपक, सौ.ज्योती दीपक व परिवाराच्या योगदानातून हा प्रकल्प साकारण्यात आला. उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.

नगरच्या इंडियन मेडिकल असोसिएशनचे सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रातील कार्य हे वाखाणण्याजोगे असून करोना संकटकाळात प्रशासनास सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून सहकार्य केल्याने अनेक ताणतणाव कमी झाले. डॉक्टरांकडून रुग्णांना चांगली सेवा दिली गेली. या संघटनेच्या पुढील कार्यासाठी व उन्नतीसाठी प्रशासनाकडून सर्वोतोपरी सहकार्य राहील, असे यावेळी जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले.

आय.एम.ए.चे शाखा अध्यक्ष डॉ.अनिल आठरे, सचिव डॉ.सचिन वहाडणे, वर्ल्ड मेडिकल असोसिएशनचे खजिनदार डॉ.रवी वानखेडकर, राज्याचे मेडिकल कॉन्सिलचे अध्यक्ष शिवकुमार उत्तुरे, सिव्हिल सर्जन डॉ.सुनील पोखर्णा, मार्गदर्शक डॉ.रवींद्र साताळकर, एम.एम.सी.चे सदस्य डॉ.निसार शेख, डॉ.किरण दीपक, डॉ.वैशाली किरण, बिल्डिंग कमिटी चेअरमन डॉ. रवींद्र सोमाणी, सचिव डॉ. बापूसाहेब कांडेकर, डॉ.अनिल पाचनेकर, डॉ.पंकज बंदरकर, सौ. दीपाली भोसले, डॉ.राजीव अग्रवाल, डॉ.सागर झावरे, डॉ.प्रकाश गरुड, डॉ.सतीश सोनवणे, डॉ.अमित करडे, खजिनदार डॉ. गणेश बडे, डॉ.प्रकाश व सुधा कांकरिया, सर्जिकल असोसिएशनचेचे डॉ.रंगनाथ सांगळे, डॉ.हर्षवर्धन तन्वर आदी सभासद उपस्थित होते.

डॉ.पद्मा कुलकर्णी यांनी आभार मानले. नव्याने उभारण्यात आलेल्या दीपज्योती एरेना या ओपन थिएटरमध्ये डॉ.सत्तार व सहकारी यांच्या सिनेगीतांचा कार्यक्रम झाला.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *