Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकउघड्या गटारांमुळे आरोग्य धोक्यात

उघड्या गटारांमुळे आरोग्य धोक्यात

जुने नाशिक l Old Nashik (प्रतिनिधी)

परिसरात मागील काही दिवसांपासून महापालिकेच्या सेवकांचे दुर्लक्ष झाल्यामुळे अनेक ठिकाणी कुंडावर घाणीचे साम्राज्य जमा झाले आहे, तर दुसरीकडे गटारीचे ढापे तुटल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहेत. विशेष म्हणजे ढापे मुख्य रस्त्यावर तुटल्यामुळे वाहनधारकांना देखील त्रास होत असून लहान-मोठ्या अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे.

- Advertisement -

महापालिका प्रशासनाने त्वरित या समस्येकडे लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. करोनाच्या काळात कामाची गती मंदावली होती तर नुकत्याच दिवाळीचा मोठा सण साजरा झाला. या काळात सलग सुट्ट्यांमुळे महापालिकेच्या अधिकारी व कर्मचारी यांचे कामाकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून आले येत आहे.

यामुळे वडाळा रोड, पखाल रोड तसेच जुने नाशिकच्या अनेक भागातील कुंडावर घाणीचे साम्राज्य जमा झाले आहेत. नियमित घाण कचरा उचलण्यात न आल्यामुळे त्यातून दुर्गंधी पसरत आहे तर दुसरीकडे काही ठिकाणी गटारीही तुटल्यामुळे देखील वास परिसरात पसरला आहे.

पूर्वीच सामान्य नागरिक करोनामुळे त्रस्त असताना त्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. स्थानिक नगरसेवक तसेच महापालिकेच्या प्रशासनाने त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या