Thursday, April 25, 2024
Homeनगरगोंडेगावात उघड्यावर शौचास बसणार्‍यांचे फोटो व्हॉट्सअ‍ॅपवर

गोंडेगावात उघड्यावर शौचास बसणार्‍यांचे फोटो व्हॉट्सअ‍ॅपवर

गोंडेगाव |वार्ताहर| Gondegav

श्रीरामपूर (Shrirampur) तालुक्यातील गोंडेगाव (Gondegav) येथे ग्रामपंचायतीने (Grampanchayat) गावातील आरोग्य व स्वच्छता (Health and Hygiene) राखण्यासाठी धडक कारवाईला सुरुवात केली आहे. त्यामुळे गावातील उघड्यावर शौचास बसणार्‍यांची (Those who defecate in the open) चांगलीच धांदल उडालेली आहे. सोशल मीडियावर (Social Media) सदरचे फोटो व्हायरल (Photo Viral) झाल्याने गावात चर्चेला उधाण आले आहे. ही कारवाई करणारे ग्रामविकास अधिकारी (Village Development Officer) चांगलेच चर्चेत आले आहेत.

- Advertisement -

मंगळवारी पहाटे सरपंच, ग्रामविकास अधिकारी (Village Development Officer) व काही ग्रामपंचायत सदस्य (Grampanchayat Member) यांनी पहाटे पहारा देऊन उघड्यावर शौचास बसणार्‍यांचे फोटो काढून सोशल मीडियावर प्रसारित केले. त्यामुळे काल दिवसभर गावात मोठ्या प्रमाणात चर्चेला उधाण आले आहे.

तालुक्यातील गोंडेगावात (Gondegav) मोठ्या नागरिक प्रमाणात सार्वजनिक ठिकाणी शौचास (Defecation in public places) जात असल्यामुळे गावातील आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच आत्ताच करोनासारखा महाभयानक रोग कमी होत असताना गावातील आरोग्य चांगले ठेवण्यासाठी व गाव स्वच्छ व सुंदर (The village is clean and beautiful) करण्यासाठी गाव हागणदारी मुक्त व्हावे, म्हणून पदाधिकारी व अधिकारी प्रयत्नात आहेत. गावातील बाहेर शौचास जाणार्‍यांपैकी बर्‍याच नागरिकांच्या घरी वैयक्तिक शौचालय बांधलेले असून त्याचा वापर न करता ते सार्वजनिक ठिकाणी शौचास जात आहेत. त्यामुळे सरपंच ग्रामविकास अधिकारी यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.

या कारवाईसाठी सरपंच सागर बढे, ग्रामविकास अधिकारी टी. के. जाधव, ग्रामपंचायत सदस्य आप्पासाहेब थोरात, ग्रामपंचायत कर्मचारी दतात्रय सोनवणे आदींनी पहाटे उठून नागरिकांवर कारवाई केली.

संबंधित नागरिकांना ग्रामपंचायत कार्यालयात बोलवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. जर त्यांनी दंड नाही भरला तर गटविकास अधिकारी यांच्याकडे संबंधित नागरिकांची यादी देऊन पुढील कारवाई म्हणून मिळणारे स्वस्त धान्य बंद व गुन्हे दाखल करण्यात येईल.

– टी. के. जाधव, ग्रामविकास अधिकारी

आम्ही संबंधित नागरिकांना दोन दिवस आधी दवंडीद्वारे सूचना देऊनही नागरिक बाहेर शौचास जात असल्याचे आढळत होते. त्यामुळे आम्हाला नाईलाजाने त्यावर कारवाई करावी लागली.

– सागर बढे, सरपंच

- Advertisment -

ताज्या बातम्या