Saturday, April 27, 2024
Homeनाशिकमशिदींमध्ये फक्त मौलानाच नमाजची परवानगी; गर्दी झाल्यास कारवाई

मशिदींमध्ये फक्त मौलानाच नमाजची परवानगी; गर्दी झाल्यास कारवाई

जुने नाशिक l Old Nashik (प्रतिनिधी) :

14 एप्रिल 2021 पासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आणखी कडक निर्बंध लागू करून एक प्रकारे लॉक डाऊनच सुरू केले. या दरम्यान मुस्लिम बांधवांचे पवित्र रमजान पर्व सुरू झाले, असून मशिदींमध्ये गर्दी होऊ नये यासाठी पोलिस विभागाने विशेष आदेश काढले आहेत.

- Advertisement -

मशिदीत फक्त मौलाना हेच नमाज पठण करतील इतरांनी गर्दी करू नये, कायदा भंग झाल्यास मौलानासह विश्वस्त यांच्यावर कारवाई होणार आहे.

याबाबतच्या नोटीस शहर परिसरातील विविध मशिदीच्या प्रवेशद्वारावर तसेच जबाबदार लोकांच्या हातात देण्यात आले आहे. पवित्र रमजान मुबारक महिन्यात एक पुण्य कामाला 70 पटीने पुण्यप्राप्ती होते. इस्लाम धर्मातील अतिपवित्र व विशेष असा या महिन्याला धार्मिक महत्व प्राप्त आहे.

या काळात पहाटेपासून संध्याकाळपर्यंत भाविक रोजा ठेवून उपाशीपोटी राहतात तर मोठ्या प्रमाणात कुरान शरीफ पठाण करीत इबादत करतात. पुरुष मंडळी दिवसातील पाच वेळाची नमाज मशिदीत जाऊन पठाण करतात तर रमजान काळात रात्री इशाची नमाजानंतर विशेष अशी तरावीची नमाज देखील मशिदीत पठाण होते, तर महिलावर्ग घरात नमाज पठण करतात.

मात्र पुन्हा करोना संसर्गाची वाढ झाल्यामुळे शासनाने कडक निर्बंध लागू केले आहे. म्हणून मशिदीत कोणीही नमाज पठण करण्यासाठी गर्दी न करता नमाजसह सर्व प्रकारचे धार्मिक विधी आपापल्या घरीच अदा करावे, मशिदीत फक्त मौलानांनाच नमाज पठण इतर कोणालाही मशिदींमध्ये प्रवेश मिळणार नाही.

त्याच प्रमाणे शुक्रवारची विशेष नमाजसह रमजान मुबारकचा शेवटचा जुमा व शब-ए-कद्र देखील मशिदीत न येतात मुस्लिम बांधवांनी घरीच प्रार्थना करावी असे आदेशित करण्यात आले आहे.

दरम्यान, मागील वर्षी पासुन मुस्लिम समाज शासनाच्या सर्व प्रकारच्या आदेशांचे पालन करीत आहे, गत वर्षी देखील रमजानसह इतर सर्व प्रकारचे धार्मिक कार्यक्रम मुस्लिम बांधवांनी घरीच केले तर रमझान ईदची नमाज देखील ईदगाह मैदानात न जाता घरीच पठाण केली होती. आताही मुस्लिम समाज शासनाच्या सूचनांचे पालन करेल अशी माहिती देण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या