Friday, April 26, 2024
Homeजळगावलग्न समारंभांना फक्त 50 जणांना परवानगी

लग्न समारंभांना फक्त 50 जणांना परवानगी

जळगाव – Jalgaon :

लॉकडाऊनमध्ये सुट मिळाल्यानंतर जिल्ह्यात सार्वजनीक कार्यक्रम सुरु झाले. अनेक लग्न समारंभ व विविध पक्षांच्या बैठकीत मोठ्या प्रमाणात गर्दी व्हायला लागली.

- Advertisement -

पूर्वीप्रमाणेच सारे उत्सव साजरे होत असल्याने सावधान कोरोनाचे संकट अजून टळले नाहीत. जिल्ह्यात लग्नसराई सुसाट, असे वृत्त दि.1 रोजी ‘देशदूत’मध्ये प्रकाशित झाले होते.

त्याची दखल घेत सर्वसाधारण सभा, मेळावे, लग्न, मुलाखती व अन्य अनुषंगिक कामांसाठी 50 लोकांनाच परवानगी असून या नियमांचे पालन करावे, अशा गाईडलाइन्स जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जाहीर केल्या आहेत.

जिल्हाधिकारी राऊत यांनी म्हटले आहे, जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव व क्टिव्ह रुग्णांची संख्या लक्षात घेता, जिल्हा प्रशासनामार्फत विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या जात आहेत. या उपाययोजनांचा भाग म्हणून वेळोवेळी शासन आणि जिल्हा प्रशासनामार्फत मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत.

खुले लॉन्स, विना वातानुकूलीत मंगल कार्यालय, हॉल, सभागृह अशा ठिकाणी व्याख्याने, मेळावे, मुलाखती, संस्थांच्या सर्वसाधारण सभा व अन्य अनुषंगिक कार्यक्रमांचे आयोजन केवळ 50 लोकांच्या मर्यादेत करता येईल.

संबंधित कार्यक्रम आयोजित करण्यासाठी या कार्यालयाकडून व अन्य् कोणत्याही विभागाकडून वेगळी परवानगी घेण्याची आवश्यकता राहणार नाही.

या कार्यक्रमाच्या ठिकाणी पारंपरिक वाद्यवृंदाचा वापर करीत असताना ध्वनी प्रदूषण (नियम व नियंत्रण) नियम, 2000 मधील नमूद बाबींचे उल्लघंन होणार नाही याची दक्षता संबंधितांनी घ्यावी. या ठिकाणी कोणत्याही प्रकारे मिरवणूक काढता येणार नाही,

खुले लॉन्स, विना वातानुकूलीत मंगल कार्यालय, हॉल, सभागृह तसेच घर व घराच्या परिसरात वर नमूद केलेल्या कार्यक्रमानुसार कोणतेही कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी अनुज्ञेय असणार नाही.

सदर कार्यक्रम स्थळी उपस्थित नागरिकांनी चेहर्‍यांवर मास्क लावणे, सॅनेटायझरचा वापर करणे बंधनकारक राहील व संबंधितांकरीता हात धुण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी आयोजकांची राहील.

या कार्यक्रमाच्या आयोजकांनी कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाचे पालन करणे आवश्यक राहील.

- Advertisment -

ताज्या बातम्या