Saturday, April 27, 2024
Homeनाशिकऑनलाईनद्वारे कर भरणा सुविधा

ऑनलाईनद्वारे कर भरणा सुविधा

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

करोना संक्रमणाचा धोका लक्षात घेत शहरवासीयांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून फोन पे द्वारे ऑनलाईन मालमत्ता व पाणीपट्टी कर भरण्याच्या सुविधेचा मालेगाव मनपातर्फे शुभारंभ करण्यात आला आहे.

- Advertisement -

घरात बसूनच कर भरता येणार असल्याने नागरिकांचा वेळ व त्रास वाचण्या सह संक्रमणाचा धोका देखील राहणार नाही त्यामुळे कर भरण्यासाठी ऑनलाइन सुविधेचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन महापौर ताहेरा शेख यांनी येथे बोलताना केले.

मनपा सभागृहात फोंते द्वारे मालमत्ता व पाणीपट्टी कर भरण्याच्या सेवेचा शुभारंभ महापौर यांच्या हस्ते करण्यात आला त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या आयुक्त त्रंबक कासार उपमहापौर निलेश आहेर पाणी समिती सभापती राजाराम जाधव उपायुक्त नितीन कापडनीस आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते ऑनलाइनद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध होत असल्याने गर्दीत अथवा रांगेत उभे राहणे टलणार आहे. विशेष म्हणजे करोना महामारीपासून वाचण्यासाठी आरोग्य यंत्रणेच्या सूचनांचे पालन देखील नागरिकांना करता येणार आहे ही सेवा जनतेच्या सुविधेसाठी असल्याने तिचा लाभ घ्यावा असे आव्हान महापौर ताहेरा शेख यांनी शेवटी बोलताना केले.

ऑनलाइनद्वारे मालमत्ता व पाणीपट्टी कर भरणे ही सुविधा मालेगाव पॅटर्नचा एक भाग असल्याचे स्पष्ट गरज आयुक्त कासार यांनी संपूर्ण राज्यात द वर्ग महानगरपालिकांमध्ये मालेगाव मनपा ही सुविधा सर्वप्रथम सुरू करत आहे करोना संकटकाळात मनपाने नागरिकांच्या सुरक्षितेस सर्वोच्च प्राधान्य दिले आहे ऑनलाइन कर भरणा सुविधा ही त्याच्याच भाग असल्याचे स्पष्ट केले.

आगामी वर्षापासून नागरिकांना कर देयकावरच क्यू आर कोड देण्यात येणार आहे त्यामुळे नागरिक घरात बसूनच आपला कर भरू शकतील असे आयुक्त कासार यांनी स्पष्ट केले यावेळी प्रभाग 1 व प्रभाग 3 मधील मालमत्ता व पाणीपट्टी चा कर भरणा फोन पे द्वारे करण्यात येऊन ऑनलाईन सेवेचा शुभारंभ टाळ्यांच्या कडकडात केला गेला या कार्यक्रमास सहाय्यक आयुक्त राहुल मढैकर, तुषार आहेर, वैभव लोंढे, लेखाधिकारी कमृद्दिन शेख, नगर सचिव पंकज सोनवणे, हरीष डिंबर, श्याम बुरकुल, सचिन महाले, दत्तात्रय काठे पुरी आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या