Thursday, April 25, 2024
Homeनाशिकप्रमाणपत्रांच्या प्रमाणिकरणासाठी ऑनलाइन यंत्रणा

प्रमाणपत्रांच्या प्रमाणिकरणासाठी ऑनलाइन यंत्रणा

परदेशी शिक्षण घेण्यासाठी इच्छुक असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी आणि परदेशातील मात्र, महाराष्ट्रात शिक्षण घेत आहेत अशा विद्यार्थ्यासाठी शैक्षणिक प्रमाणपत्र प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे.

सध्याची कराेना परिस्थिती विचारात घेऊन व त्याचप्रमाणे डिजिटल महाराष्ट्र मोहिमेअंतर्गत निश्चित केलेली उद्दिष्टे विचारात घेऊन अशा विद्यार्थ्याकरिता प्रमाणिकरणाची प्रक्रिया अधिकाधिक सुटसुटीत आणि सोपी व्हावी म्हणून आॅनलाइन प्राेसेस सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी https://digitalattestation.mahait.org/ हे पोर्टल उपलब्ध करण्यात आले आहे.

- Advertisement -

याबाबत विद्यार्थ्यांना कळविले जावे, असे निर्देश तंत्रशिक्षण संचालक

डॉ. अभय वाघ यांनी मुंबई, पुणे, नाशिक, आैरंगाबाद, अमरावती व नागपूरच्या तंत्रशिक्षण विभागाच्या सहसंचालकांना कळविले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या