Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यागणेश मंडळांसाठी ऑनलाईन परवानगीची सोय

गणेश मंडळांसाठी ऑनलाईन परवानगीची सोय

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक महापालिकेच्या ( NMC )वतीने आगामी गणेशोत्सवाची ( Ganesh Festival ) जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. यासाठीच्या नियोजनासाठी विभागीय स्तरावर बैठका घेण्यात येत असून गणेश मंडळांना परवानगी देण्यासाठी महापालिकेने ऑनलाईन प्रणाली (Online system by Municipal Corporation to allow Ganesh Mandals)सुरू केली आहे. त्यासाठी महापालिकेच्या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करता येणार आहे.

- Advertisement -

नाशिक महापालिकेच्या पूर्व विभागात आज नियोजनासंदर्भात बैठक घेण्यात आली. गणेश मंडळांनी ऑनलाईन अर्ज करताना अर्जासोबत आधारकार्ड, हमीपत्र व जागेचा नकाशा जोडणे बंधनकारक राहणार आहे. त्यानंतर महापालिका पडताळणी करून परवानगी देईल. त्यासाठी मंडळांनी तत्काळ ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांची मनपाच्या पूर्व विभाग कार्यालयात बैठक पार पडली. यावेळी विभागीय अधिकारी नितीन नेर, भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता पवार, प्रफुल्ल जाधव, दिनकर कदम यांनी मार्गदर्शन केले. कोणत्याही मंडळाने विनापरवानगी उत्सव साजरा करू नये. तसे केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

मनपाने दिलेल्या परवानगीचे पत्र मंडळाच्या दर्शनी भागात लावावे. महसूल विभागाच्या पथकांकडून त्यांची तपासणी करण्यात येणार आहे. यावेळी परवानगी पत्र लावलेले नसेल तर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. मंडळांनी अखेरच्या दिवशी गर्दी न करता आताच प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. बैठकीस मनपा, पोलीस आणि अग्निशमन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या