Friday, April 26, 2024
HomeUncategorizedफेसबूक मेसेंजरद्वारे करता येणार ऑनलाईन पेमेंट

फेसबूक मेसेंजरद्वारे करता येणार ऑनलाईन पेमेंट

नवी दिल्ली | New Delhi

फेसबूक मेसेंजरमध्ये आता 3 नवे फीचर्स सामिल करण्यात आले आहे. या फीचर्समध्ये क्विक रिप्लाय बार, QR कोडसह पेमेंट, आणि नव्या चॅट थीम्स सामिल आहेत. या नव्या फीचर्समुळे अधिकयुजर्सला फेसबुक मेसेंजरवर सुविधा मिळतील…

- Advertisement -

क्विक रिप्लाय बार

मेसेंजरमध्ये क्विक रिप्लाय बार फीचरचा वापर करुन युजर आपल्या चॅटमध्ये पाठवण्यात आलेल्या फोटो किंवा व्हिडीओवर फास्ट रिप्लाय करू शकतील. युजरला फोटो किंवा व्हिडीओवर टॅप करावे लागेल, जिथे क्विक रिप्लाय विंडो ओपन होईल.

QR कोड आणि पेमेंट लिंक

या फीचरचा वापर करुन युजर आपल्या मेसेंजरद्वारे QR कोड स्कॅन करुन दुसऱ्या व्यक्तीला पैसे ट्रान्सफर करू शकतो. यासाठी युजरला फेसबुक किंवा दुसरे कोणतेही अॅप डाउनलोड करण्याची गरज लागणार नाही. युजरला मेसेंजर सेटिंगमध्ये फेसबुक पे द्वारे आपला QR कोड दुसऱ्या व्यक्तीला पाठवावा लागेल, जिथे पैसे पाठवायचे आहेत किंवा ज्याच्याकडून घ्यायचे आहेत.

नव्या चॅट थीम्स

फेसबुकने मेसेंजर आणि इन्स्टाग्रामवर नवी चॅट थीम सामिल केली आहे. या थीम्सचा वापर करण्यासाठी युजर चॅट सेटिंगमध्ये आवडीच्या थीमवर क्लिक करू शकतात.

- Advertisment -

ताज्या बातम्या