Wednesday, April 24, 2024
Homeनाशिक‘जागर लोककलेचा, वसा स्त्री शक्तीचा’

‘जागर लोककलेचा, वसा स्त्री शक्तीचा’

नाशिक । प्रतिनिधी

मराठा सेवा संघ प्रणित महाराष्ट्र जिजाऊ ब्रिगेड तर्फे नवरात्रोत्सवानिमित्त नऊ दिवस जागर लोककलेचा,वसा स्त्री शक्तीचा या ऑनलाईन उर्पक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

- Advertisement -

ऑनलाइन होणार्‍या कार्यक्रमाचे घटस्थापनेच्या दिवशी शनिवार (दि. 17) रोजी दुपारी 2 वाजता जिजाऊ ब्रिगेडच्या मार्गदर्शक आमदार रेखा खेडेकर यांच्या हस्ते होणार आहे.

या उपक्रमात दररोज बहुजन महानायिकांचे एकपात्री प्रयोग तसेच महाराष्ट्रभरातील विविध सांस्कृतिक लोकगीते जिजाऊ ब्रिगेड महिला सादर करतील तसेच अनिष्ठ रुढी परंपरा,अंधश्रद्धा निर्मूलनपर तसेच स्री शक्तीचे दर्शन या विषयांवर व्याख्यानमालेचे सह भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

त्यानंतर सांगली जिजाऊ ब्रिगेड राजमाता जिजाऊ यांच्या जीवनावर एकपात्री प्रयोग तसेच मुलींचा गरबा नृत्य सादर करतील.

त्यानंतर अमरावती जिजाऊ ब्रिगेड प्रबोधन गित,शेतीगीत,स्त्री शक्तीगीत,ओव्या सादर करणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या