Friday, April 26, 2024
Homeनगरशिक्षक बँकेची ऑनलाईन सभा चालली साडे सात तास

शिक्षक बँकेची ऑनलाईन सभा चालली साडे सात तास

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची (District Primary Teachers Bank) 102 वी वार्षिक सर्वसाधारण सभा (Annual General Meeting) रविवारी पारपडली. ही सभा ऑनलाईन (Online Meeting) पध्दतीने साडे सात तासांहून अधिक काळ चालली. सभेत संचालक मंडळाने बँकेच्या सर्व प्रकारच्या व्याजदारात (Intrest) पाव टक्का कपात करण्याचा निर्णय (Decision) घेतला असून यावेळी बँकेचे अध्यक्ष सलीमखान पठाण (Bank Chairman Salim Khan Pathan) यांनी विरोधकांचे सर्व आरोप फेटाळत गैरप्रकार (Malpractice) सिध्द झाल्यास सर्व पदाचा राजीनामा (Resigned) देण्याचे आव्हानच विरोधकांना दिले. दरम्यान ऑनलाईन सभेला (Online Meeting) झुमवर 1 हजार 293 तर यु टूवर 3 हजार 778 सभासदांनी हजेरी लावत कामकाजात सहभाग घेतला.

- Advertisement -

जिल्हा शिक्षक बँकेची सर्वसाधारण सभा (General meeting of District Teachers Bank) रविवारी ऑनलाईन (Online) पध्दतीने पारपडली. अध्यक्षस्थानी पठाण होते. दरवर्षी प्रमाणे शिक्षकांच्या सभे गोंधळ (Confusion) होवू नयेत, यासाठी संचालकपर्यंत कोणालाच येणार नाही, अशी व्यवस्था करण्यात आली होती. यासह सभेत नेत्यांपासून सामान्य सभासदांना प्रत्येकी पाच मिनीट बोलण्याची संधी देण्यात आली. सभेत मयत पडलेल्या सभासदांचे कर्ज माफ करण्यासोबत त्यांची देणे देण्यासाठी मयत सभासद कर्ज निवारण निधीसाठी (Deceased Member Debt Relief Fund) दुसरीकडील पैसे तात्पुर्ते वर्ग करून संबंधीतांना लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला. कुटुंब आधार योजनेत मृत सभासदांच्या कुटूंबांना 10 लाखांची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला असून यासाठी सभासदांकडून 150 ऐवजी 500 कपात घेण्यात येणार असून ठरावी काळानंतर ती कमी करण्यात येणार आहे. यासह सभासदांना सभा संपल्यानंतर सात टक्के लाभांश त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे.

आरबीआयच्या (RBI) सुचनेनूसार बँकेची कोअर बँक (Bank) प्रणाली सुधारण्यात येणार असून काही ठिकाणी पदोन्नतीने शाखाधिकारी भरण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष पठाण यांनी दिली. तत्पूर्वी प्रस्ताविक संचालक साहेबराव अनाम यांनी केले. संचालक सुयोग पवार यांनी स्वागत केले. यावेळी उपाध्यक्ष बाबासाहेब खरात, राजु राहणे, उषा बनकर, शरद सुद्रिक, अर्जुन शिरसाठ, संतोष दुसुंगे, नानासाहेब बडाख, बाळासाहेब मुखेकर, सिमा क्षिरसागर, विद्यलता आढाव, दिलीप औताडे, किसन खेमनर, राजु मुंगसे, अविनाश निंभोरे, संतोष अकोलकर, अनिल भवर, गंगाराम गोडे, मंजुषा नरवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप मुरदारे, बोर्ड सेक्रेटरी गणेश पाटील यांनी सभेच्या कामकाजात सहभाग घेतला.

निवडणुक घेण्याचा ठराव

सभेत ऐनवेळच्या विषयात अध्यक्ष पठाण यांनी बँकेची मुदत मागील वर्षी संपलेली असून करोनामुळे मुदत वाढ मिळालेली आहे. मात्र, संचालक मंडळाची तातडीने निवडणूक घेण्याची इच्छा असून याबाबतचा ठराव सर्वसाधारण सभेत मांडण्यात आला. यासर्व विषय मंजूर करण्यात आले.

व्यक्तीगत द्वेषाने भांडू नका : तांबे

आपल्या मनोगतात गुरूमाऊलीचे नेते बापूसाहेब तांबे यांनी विरोधकांना व्यक्तीगत द्वेषाने भांडू नका, असे आवाहन करत आपण शिक्षक आहोत. संचालक मंडळाच्या चुकीच्या निर्णयावर बोला, पण खोटे बोल अन् रेटून बोल या प्रमाणे शेताच्या बांधाच्या वादाप्रमाणे वागू नका, असा सल्ला दिला.

- Advertisment -

ताज्या बातम्या