उद्योगांतील 256 जागांसाठी ऑनलाईन रोजगार मेळावा

jalgaon-digital
1 Min Read

सातपूर | प्रतिनिधी | Satpur

जिल्ह्यातील नोंदणीकृत उमेदवारांना रोजगार (Employment) उपलब्ध होण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने (Skill Development, Employment and Entrepreneurship Guidance Center) दि.26 ते दि.30 जुलैदरम्यान पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाइन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे…

नोंदणीकृत उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी 254 रिक्त पदे ऑनलाइन प्राप्त झाली आहेत. त्यानूसार ऑनलाइन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

व्हिडिओ कॉन्फरन्स, मोबाइल, दूरध्वनीद्वारे ऑनलाइन मुलाखती (Online interviews) घेतल्या जाणार आहेत.

मेळाव्यात सहभागी होऊ इच्छिणार्‍या उमेदवारांना मेळाव्यापूर्वी ‘ऑप्शनल ट्रेड अ‍ॅप्रेंटिसशिपमधील संधी’ (‘Opportunities in Optional Trade Apprenticeship’) या विषयावर मार्गदर्शन सोमवारी (दि.26) दुपारी 3 वाजता आयोजित करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण कार्यालयाच्या अधिकृत नाशिक स्कील या फेसबूक पेजवरून करण्यात येणार आहे.

उद्योगांतील रिक्त जागा

महिंद्रा इपीसी इरिगेशन – ट्रेनी – 50 जागा, व्हीआयपी इंड्रस्टीज – एनएपीएस ट्रेनी – 150 जागा, सोपान हॉस्पिटल -आरएमओ 4 जागा, स्नेह एंटरप्रायझेस – हाउसकिपर – 20 जागा, महावीर व्हिल्स – सेल्स – 10 जागा, मेकॅनिक – 10 जागा, सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह – 10 जागा, एकूण पदे – 30 जागा अशी 254 रिक्त पदे ऑनलाइन प्राप्त झाली आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *