Thursday, April 25, 2024
Homeजळगावश्री जळगाव माहेश्वरी विवाह सहयोग समितीतर्फे ऑनलाइन परिचय संमेलन

श्री जळगाव माहेश्वरी विवाह सहयोग समितीतर्फे ऑनलाइन परिचय संमेलन

जळगाव- Jalgaon

श्री जळगाव माहेश्वरी विवाह सहयोग समितीतर्फे (Shri Jalgaon Maheshwari Vivah Sahyog Samiti) ऑनलाइन परिचय संमेलनाचे आयोजन दि. २३ व २४ ऑक्टोबर रोजी महेश प्रगती मंडळ ( Mahesh Pragati Mandal) जळगाव येथे करण्यात आले.

- Advertisement -

या कार्यक्रमाचे उद्घाटन माहेश्वरी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्यामसुंदर सोनी यांच्याहस्ते ऑनलाईन करण्यात आले. हयावेळी प्रमुख अतिथी महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी समाजाचे अध्यक्ष श्रीकिसन भंसाली, सुप्रसिद्ध विवाह समुपदेशक निशा चांडक ऑनलाईन (online) उपस्थित होते.

जळगाव माहेश्वरी विवाह सहयोग समितीचे अध्यक्ष श्यामसुंदर झंवर, सचिव सुरजमल सोमाणी, प्रमोद झंवर, वासुदेव बेहेडे, सुभाष जाखेटे, डॉ.जगदीश लढ्ढा, विवेकानंद सोनी, प्रकल्प प्रमुख प्रदेश संघटनमंत्री प्रा.संजय दहाड, प्रदेश उपाध्यक्ष मनीष झंवर, जिल्हाध्यक्ष एड.नारायण लाठी, जिल्हा सचिव माणकचंद झंवर, जिल्हा महिला अध्यक्षा राधा झंवर, डॉ.संगीता चांडक यांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व महेश पूजनने करण्यात आली.

मनीषा झंवर, सायली झंवर, वैष्णवी झंवर यांनी महेश वंदना गायली. शामसुंदर झंवर यांनी उपस्थितांचे शब्द सुमनांनी स्वागत केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा,. संजय दहाड यांनी केले व ऑनलाइन (online) परिचय संमेलनाची वैशिष्ट्ये सांगितले.

विवाह समुपदेशक निषा चांडक यांनी जीवन साथी ची निवड करताना कशाकशाचा विचार करावा याविषयी मार्गदर्शन केले. महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेचे अध्यक्ष श्रीकिसन भंसाली यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

अखिल भारतीय माहेश्वरी महासभेचे सन्माननीय अध्यक्ष श्री श्यामसुंदर सोनी यांनी समाजाची विद्यमान स्थिती, वैवाहिक जीवनात यशस्वी होण्यासाठी घ्यावयाची काळजी इ. विषयावर मार्गदर्शन केले.

२४ तारखेला देशातील विविध भागातील माहेश्वरी समाजाचे विवाह योग्य युवक व युवती यांचे ऑनलाईन चर्चासत्र आयोजित करण्यात आले. विवाह सहयोग समितीचे सदस्यांनी कॉर्डिनेटर म्हणून काम पाहिले. परिचय संमेलनात साधारणतः १५० पेक्षा जास्त युवती व ३५० पेक्षा जास्त युवकांनी सहभाग नोंदविला. साधारणतः २०० युवक युवती प्रत्याशी व त्यांच्या परिवारातील सदस्यांनी प्रत्यक्ष ऑनलाइन (online) बैठकात सहभाग घेऊन आपापसात चर्चा केली.

यशस्वीतेसाठी रिश्ते धागे पुणे या आॅर्गनायझेशनचे धिरज मर्दा, विवाह सहयोग समिती जळगावचे विशाल मंत्री, तेजस देपुरा, गिरीश झंवर, महेश मंडोरे, दीपक कासट, अभिजीत झंवर, शेपाली लाठी, सोनल सोमाणी, सोनाली जाजू, प्रा.बी.जे.लाठी, राजेंद्र काबरा, निधी भट्टड, राणी लाहोटी, रुपेश झंवर, जगदीश जाखेटे, अनुप जाजू, प्रशांत बियाणी, विलास करवा, चेतन दहाड, स्वप्निल मालपाणी, स्वाती झंवर, रचना मंत्री, हर्षल जाखेटे, दीपक लढ्ढा, प्रदीप मणियार, अजय दहाड, सुनील कासट, कैलास लाठी, विनोद मुंदडा, गोविंद लाठी, लोकेश राठी, एड.राहुल झंवर, वासंती बेहेडे, सरीता लाठी, योगेश मंडोरा, सुभाष जाखेटे यांनी परिश्रम घेतले.

- Advertisment -

ताज्या बातम्या