Friday, May 10, 2024
Homeनाशिकऑनलाईन मागवले फेशियल किट; बॉक्समध्ये निघाला दगड

ऑनलाईन मागवले फेशियल किट; बॉक्समध्ये निघाला दगड

नाशिकरोड । Nashik Road

ऑनलाइन शॉपिंग केल्यानंतर सलून व्यावसायिकाला फेशियल कीटऐवजी हातात दगड मिळाल्याचा प्रकार नाशिकरोडला घडला.

- Advertisement -

डावखरवाडी येथील के.जे. मेहता हायस्कूलजवळील सलून व्यवसायिक संजय बुधा निकम यांनी व्यवसायासाठी एका ऑनलाइन शॉपिंग पोर्टलवरुन १० ऑक्टोबरला ७६७ रुपयांचे फेशियल किट मागवले होते.

पण धक्कादायक बाब म्हणजे १८ ऑक्टोबरला त्यांना डिलिव्हरीत मिळालेल्या बॉक्समध्ये चक्क काँक्रीटचा दगड मिळाला. हताश होऊन त्यांनी संबंधित कंपनीशी संपर्क साधला.

कंपनीने फेशियल किट देण्याचे आश्वासन दिले. मात्र, तीन दिवस झाले तरी कार्यवाही झालेली नाही, अशी माहिती संजय निकम यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या