Saturday, April 27, 2024
Homeनगरअमेरिकेतून ऑनलाईन घटस्फोट नगर न्यायालयाने केला मंजूर

अमेरिकेतून ऑनलाईन घटस्फोट नगर न्यायालयाने केला मंजूर

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

व्हॉट्सअ‍ॅपवर व्हिडीओ कॉल करत ऑनलाईन सुनावणी घेऊन अमेरिकेत राहत असलेला पती व त्याची भारतात राहत असलेली

- Advertisement -

पत्नी या विवाहित जोडप्याचा परस्पर संमतीने होत असलेला घटस्फोट नगर येथील न्यायालयाने मंजूर करत या पद्धतीचा जिल्ह्यातील पहिला निकाल दिला.

याबाबत अधिक माहिती अशी की, या घटनेतील नीरज (नाव बदलले आहे) हा पाथर्डी तालुक्यातील तरुण अमेरिकेत सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून एका कंपनीत नोकरीस आहे. ठाणे येथील श्रध्दा (नाव बदलले आहे) या उच्चशिक्षित तरुणीशी त्याचा 2018 साली विवाह झाला होता. विवाहानंतर दोघेही अमेरिकेत स्थायिक झाले.

मात्र काळाच्या ओघात दोघांमध्ये वैचारिक मतभेद झाल्याने त्यांनी व त्यांच्या कुटुंबांनी आपसात चर्चा करून परस्पर संमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. निर्णय होण्यापूर्वीच श्रद्धा ही भारतात आपल्या माहेरी आली होती. या दोघांनाही परस्पर संमतीने घटस्फोट द्यावा, असा अर्ज पाथर्डी येथील वकील सचिन बडे यांनी नगर येथील न्यायालयात दाखल केला. मात्र लॉकडाऊन असल्याने नीरज याला सुनावणीच्या दरम्यान उपस्थित राहता न आल्याने खटला लांबला.

मात्र त्या नंतर न्यायालयाने नीरज यास जर खरोखर घटस्फोट हवा असल्यास अमेरिकेत त्या आशयाचे प्रतिज्ञापत्र तयार करून ते वकील सचिन बडे यांच्या मार्फत न्यायालयासमोर सादर करण्यास सांगितले. त्या नंतर नीरज याने अमेरिकेत प्रतिज्ञापत्र तयार करून ते बडे यांच्या मार्फत न्यायालयात सादर केल्यानंतर नगर न्यायालयातील न्यायाधीश पी. एम. उन्हाळे यांनी बडे यांच्या मोबाईल वरून नीरज यास व्हिडीओ कॉल केला. आपण सादर केलेले प्रतिज्ञापत्र खरे असून आपणास घटस्फोट हवा असल्याचे या सुनावणीत सांगितल्यानंतर न्यायाधीश पी. एम. उन्हाळे यांनी या घटस्फोटास मंजुरी दिली. सोशल मीडियाचा वापर करत दिलेला नगर न्यायालयातील या प्रकाराचा पहिलाच निकाल ठरला.

- Advertisment -

ताज्या बातम्या