Thursday, May 2, 2024
Homeनाशिक'फ्रेन्डशिप डे'चे ऑनलाईन सेलिब्रेशन

‘फ्रेन्डशिप डे’चे ऑनलाईन सेलिब्रेशन

नाशिक | Nashik

सोशल मीडियावर (Social Media) फ्रेन्डशिप डे (Friendship Day) मोठ्या प्रमाणावर सेलिब्रेट केला जात आहे. अनेक व्हिडीओ, काही संदेश पाठवून शुभेच्छा देत आहेत. एकीकडे करोनामुळे सर्व बंद असताना मैत्रिदिन मात्र ऑनलाईन सुरू असल्याचे पाहायला मिळाले.

- Advertisement -

ऑगस्टच्या पहिल्या रविवारी फ्रेन्डशिप डे साजरा केला जातो. यंदा ऑगस्टच्या एक तारखेलाच म्हणजेच रविवार हा दिवस आला. परंतु सलग दुसऱ्या वर्षी करोना प्रादुर्भावामुळे (Corona) यंदाही सेलिब्रेट करता येणार नाही. परंतु मित्र मैत्रिणीं ऑनलाईन येत एकमेकांना शुभेच्छा देत फ्रेन्डशिप डे साजरा करण्यावर भर दिला.

दरम्यान मैत्रीची व्याख्या विशद करणाऱ्या संदेशांनी समाजमाध्यमांवर शनिवारपासूनच गर्दी करीत ‘फ्रेंडशिप डे’च्या शुभेच्छांचा वर्षाव (Friendship Day Celebration) सुरू केला आहे. करोनाचे सावट सलग दुसऱ्या वर्षी ‘फ्रेंडशिप डे’वर कायम राहणार आहे. कॉलेज बंद असल्याने महाविद्यालयांमध्ये बहरणारा फ्रेंडशिप डे देखील यंदा होऊ शकणार नाही.

त्यात वीकेंड लॉकडाऊन (Weekend Lockdown) कायम असल्याने गिफ्टची देवाणघेवाण, बँडची बांधाबांध, कॉलेजमध्ये आणि कॉलेजबाहेरील निसर्गरम्य परिसरात मुक्तपणे बागडणारे ‘मित्र-मैत्रिणी’ असा कोणताच माहोल यंदाच्या वर्षीदेखील राहणार नाही. मात्र त्यामुळे मैत्रीच्या नात्यात बाधा येऊ नये, अशी दक्षता घेण्यासाठी युवा वर्गाकडून समाजमाध्यमांच्या वापराला प्राधान्य दिले जात आहे.

युवा वर्गाकडून स्टेटसलाही (Whatsapp Status) अशाच स्वरूपाचे विविध संदेश ठेवले जात आहेत, तर अनेक मध्यमवयीन आणि ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्या व्हॉटसॲप स्टेटसला शालेय स्नेहसंमेलनात पुन्हा गवसलेल्या जुन्या मित्रांचे फोटो ठेवले आहेत. त्याशिवाय मैत्री दिनाच्या शुभेच्छांचा वर्षाव तर शनिवारपासूनच सुरू झाला आहे. त्यामुळे आजचा ऑगस्ट महिन्यातील पहिलाच दिवस हा मैत्री दिनाच्या शुभेच्छांनीच बहरणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या