Thursday, April 25, 2024
Homeनाशिकखराब हवामानामुळे कांदा पुन्हा संकटात

खराब हवामानामुळे कांदा पुन्हा संकटात

पाटोदा । वार्ताहर Patoda

सप्टेंबर महिन्यात सततच्या चाललेल्या पावसामुळे व कृमी पडल्यामुळे खराब झालेले कांदा रोपे, यामुळे शेतकर्‍यांना पाहिजे त्या प्रमाणात कांदा लागवड करता आली नाही.

- Advertisement -

या सगळ्या संकटातून तरुण मोठ्या प्रमाणात औषध फवारणी करून खर्चिक ठरलेला थोड्याफार प्रमाणात लागवड करण्यात आलेला लाल कांदा काढण्याच्या अंतिम टप्प्यात आलेला असताना खराब हवामानामुळे पुन्हा संकटात सापडला आहे.

दोन दिवसात हवामान पूर्णतः बिघडले असल्यामुळे काढणीस आलेले कांदा पीक धोक्यात आलेले आहे. कोणत्या क्षणाला गारपीट होईल हेही अंदाज शेतकर्‍यांना बांधणे आता मुश्कील होऊन बसले आहे. डिसेंबर महिन्यातील थंडी कांद्याच्या फुगवणीसाठी अनुकूल असली तरी कांदा काढणीच्या वेळेला पुरेसा सूर्यप्रकाश पडत नसेल आणि ढगाळ वातावरण तयार होत असेल तर काढणीस आलेला कांदा सडण्याचे प्रमाण अधिक असते. त्यातच दोन दिवसांपासून थोड्या प्रमाणात पावसाचे थेंब पडत आहेत. त्यामुळे काढणीस आलेला कांदा काढण्यात पूर्वी शेतातच खराब होतो की काय या विचाराने शेतकरी विवंचनेत पडला आहे.

अवाढव्य भावामध्ये खरेदी केलेले कांद्याचे ऊळे व त्यानंतर ते जगवण्यासाठी औषधांवर केलेला खर्च पुन्हा कांदे जगवण्यासाठी औषधांवरती केलेला खर्च भरून काढण्यासाठी शेतकर्‍याचे आटोकाट प्रयत्न चालू असताना आता हे अस्मानी संकट शेतकर्‍याला पुन्हा कर्जाच्या गर्तेत घेऊन जाते की काय या विचाराने शेतकरी हवालदिल होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या