Saturday, April 27, 2024
Homeधुळेकांद्याचा टॅक्टर उलटला, चालकासह मजूर बचावले

कांद्याचा टॅक्टर उलटला, चालकासह मजूर बचावले

पिंपळनेर Pimpalner । वार्ताहर

येथील जेबापूर रस्ता (Jebapur Road) मृत्यूचा सापळा (Death trap) बनला आहे. आज दुपारी कांदा मार्केटमधून (onion market) कांदा घेऊन पिंपळनेरकडे येणारे ट्रॅक्टर पलटी (Tractor overturned) होवून अपघात (accident) झाला. त्यात सुदैवाने चालकासह ट्रॅक्टरवरील मजुरांचे (laborers, driver) प्राण वाचले. पंरतू कांदा आणि टॅक्टरचे नुकसान (Loss of onion and tractor) झाले आहे.

- Advertisement -

पिंपळनेर-जेबापूर रस्त्यावर कृषी उत्पन्न उपबाजार समितीने बी.टी.के यांच्या खुल्या जागेवर कांदा मार्केट सुरू केले आहे. मात्र या मार्केटपर्यंत शेतकर्‍यांना वाहन चालवताना जीव मुठीत धरून चालवावे लागते. तीन किलोमीटर अंतरापर्यंत रस्त्यावर मोठमोठ्या खड्ड्यांचे साम्राज्य आहे. शेतकर्‍यांचे ट्रॅक्टर, पिकअप वाहन व दुचाकी वाहने देखील चालवणे शक्य होत नाही. याच रस्त्यावर अनेक वाहने आत्तापर्यंत पलटी झाले असून अनेक शेतकरी जखमी झाले आहेत. जेबापूर, धंगाई, रोहन, दापुर गावाकडे विद्यार्थ्यांच्या स्कूल बसेस याच रस्त्याने जातात.

आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास कांदा मार्केटमध्ये लिलाव झाल्यानंतर छाईल येथील ट्रॅक्टर कांदा भरून पिंपळनेरकडे येत होते. तेव्हा सुदाम गोरख पगारे यांच्या शेताजवळ समोरून येणार्‍या वाहनाला साईड देतांना मोठमोठे खड्डे असल्याने व रस्ता खराब असल्याने ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला पलटी झाला.

सुदैवाने चालक व ट्रॉलीवर बसलेल्या मजुरांचे प्राण वाचले. याकडे मात्र मार्केट कमिटी तसेच लोकप्रतिनिधी, बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. तसेच दिपवाळीनंतर एकादशीला तीर्थक्षेत्र आमळी येथे तीन ते चार दिवसाचा मोठा यात्रोत्सव भरतो. या यात्रेलाही या रस्त्याने व्यापारी, यात्रेकरू जातात. त्यामुळे लवकरात लवकर या दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या