Wednesday, April 24, 2024
Homeनाशिककांदा चोरांना अटक; पोलिसांचे कौतुक

कांदा चोरांना अटक; पोलिसांचे कौतुक

कळवण | Kalwan

कळवण तालुक्यातील नवीबेजच्या देवरे वस्तीवर बुधवारी झालेल्या कांदाचोरीचा तपास कळवण पोलिसांनी अवघ्या 24 तासात शिताफीने लावून चौघांना पिकअप वाहनासह ताब्यात घेतले असून कळवण पोलीस ठाण्यामध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

बुधवारी दुपारी जुनी भेंडी चौफुलीवरील सीसीटीव्ही कॅमेरे पोलीस उपनिरीक्षक वाघमोडे यांनी तपासले मात्र काही निष्पन्न निघाले नाही. भेंडी गावातून वरवंडी मार्ग मंगळवारी रात्री पीक वाहन गेल्याची आणि तेच वाहन बुधवारी दुपारी वरवंडी शिवारात मळ्यात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांना मिळाली.

माहितीच्या आधारे त्यांनी पोलिसांचा सापळा रचला. त्यात वाहतूक पोलीस सचिन राऊत यांना भेंडी ते वरवंडी रस्त्यावर गस्तीवर पाठविल्यानंतर त्यांना पिकअप भेंडी गावाकडे येत असल्याचे आढळून आले. राऊत यांनी पिकअप वाहन चालकाकडे चौकशी केली असता शेणखत घेण्यासाठी गेलो असल्याचे सांगून उडवाउडवीचे उत्तरे दिली.

त्यातून त्यांना संशय आल्याने कळवण पोलिस ठाण्याला पिकअप आणल्यानंतर पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर वाहन चालक राजेंद्र देवरे याने राजकुमार देवरे यांच्या कांदा चाळीतून चौघांनी कांदा चोरी केली. पिंपळगाव बसवंत येथे कांदा विकल्याची कबुली पोलिसांना दिली.

पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता वाहनचालक राजेंद्र तुकाराम देवरे यांच्यासह गोविंदा कृष्णा चिंधे, खुशाल भिका पवार, जगन मोतीराम जाधव हे कांदा चोरीत सहभागी असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. कांदा चोरी प्रकरणी चारही जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या