Friday, April 26, 2024
Homeनगरकांदा पेरणीकडे शेतकऱ्यांचा वाढता कल !

कांदा पेरणीकडे शेतकऱ्यांचा वाढता कल !

जेऊर कुंभारी| वार्ताहार| Jeur Kumbhari

गेल्या वर्षापेक्षा चालू वर्षी पावसाचे (Rain) प्रमाण जास्त असल्यामुळे कांद्याचे रोप (Onion Crops) टाकून उशिरा कांद्याची लागवड (Onion Cultivation) करण्यापेक्षा कोपरगाव तालुक्यातील (Kopargav Taluka) जेऊर कुंभारी (Jeur Kumbhari) येथील शेतकऱ्यांनी कांदा पेरणी (Onion Sowing) पसंत केली. त्यामुळे कांदा लागवडीवर (Onion Cultivation) होणारा खर्च कमी झाला. जेऊर कुंभारी (jeur Kumbhari) परिसरातील माजी सरपंच यशवंत आव्हाड यांच्या सहा एकर शेतामध्ये यांत्रिकी साधनांच्या साह्यांने कांदा पेरणी पसंत केली आहे.

- Advertisement -

कांदा बियाणे (Onion Seeds) यावर्षी १० हजार रुपये पाहिली गेला आहे. कांदा बियाणाचा (Onion Seeds) एवढा भाव वाढल्यामुळे बियाण्यापासून रोपे तयार करून लागवडीचा खर्च शेतकऱ्यांना काही परवडण्यासारखा नाही रोपे टाकून कांदा लागवड (Onion Cultivation) करण्यापेक्षा कांदा पेरणी कडे लक्ष दिले जात आहे. या अगोदर चांदेकसरे, जेऊर कुंभारी डाऊच खुर्द, घारी, पोहेगाव या भागातील शेतकऱ्यांनी कांदा पेरणी केली आहे.

त्यामुळे यावर्षी जेऊर कुंभारी पंचक्रोशीत ६० टक्के शेतकऱ्यांनी आपल्या शेतात कांदा पेरणी केली. कांदा पेरणीतून एकरी दोनशे क्विंटलपर्यंत उत्पन्नाची अपेक्षा आहे असे शेतकरी माजी सरपंच यशवंत आव्हाड यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या