Friday, April 26, 2024
Homeनगरकांदाचाळ उभारणीसाठी 50 टक्के अनुदान

कांदाचाळ उभारणीसाठी 50 टक्के अनुदान

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांसाठी दिलासा देणारा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे.

- Advertisement -

कांदा चाळ उभारणीसाठी राज्यसरकारने 60 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली 27 व्या राज्यस्तरीय प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे.

सदर प्रकल्पांतर्गत एकूण रु. 150 कोटींचा कार्यक्रम राबविण्यात येणार असून राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत अर्थसहाय्याच्या स्वरुपात 60 कोटी रुपयांचा निधी एका वर्षाच्या कालावधीसाठी मंजूर करण्यात आला आहे.

राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत उभारण्यात येणार्‍या कांदा चाळ योजनेसाठी राज्यासाठी 60 कोटी रकमेच्या योजनेस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

शेतकर्‍यांनी मोठ्या कष्टाने पिकवलेला कांदा व्यवस्थित राहून त्याची टिकवण क्षमता काही प्रमाणात वाढवण्यासाठी कांदा चाळ अनुदान योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत कांदा चाळ उभारल्यानंतर कृषी विभागाच्या अधिकार्‍यांकडून पडताळणी करून नंतर अनुदानाची रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे.

2019-20 मध्ये राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत मकांदाचाळ उभारणी प्रकल्पफ राज्यात राबविण्यास 60 कोटींच्या निधी वितरणास प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. हा प्रकल्प 50:50 या प्रमाणात राबविण्यात येणार आहे. त्यानुसार वैयक्तिक लाभार्थ्यांना एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाच्या मापदंडानुसार अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी 60 कोटी निधी आरकेव्हीवाय अंतर्गत उपलब्ध करून देण्यात येत आहे.

विभागाच्या हॉर्टनेट प्रणालीद्वारे शेतकर्‍यांचे अर्ज ऑनलाईन मागवून घेण्यात येणार आहे. त्यानंतर लाभार्थ्यांचीसोडत पध्दतीने निवड कर्‍यात येणार आहे. लाभार्थ्यांच्या कांदा चाळीची उभारणी केल्यानंतर त्याबाबतच्या नोंदी जिओ-टॅगींगद्वारे करण्यात येणार आहे. लाभार्थ्यांच्या सातबारा उतार्‍यावर नोंद केल्यानंतर अनुदान अदा केले जाणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या