Friday, April 26, 2024
Homeनाशिककांदा रोपे संकटात

कांदा रोपे संकटात

अंदरसूल । वार्ताहर Andarsul

अंदरसुल लाभक्षेत्रात कांदा लागवडीसाठी तयार झालेल्या कांद्याच्या रोपांना वातावरणातील सततच्या बदलाचा मोठा फटका बसला आहे. रोपे पिवळी पडून जागेवरच सडत आहेत. जवळपास 70 ते 75 टक्के कांदा रोपे वाया गेल्यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे यंदा लाल कांद्यालाही चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

यंदा जून महिन्यात हंगामाच्या सुरुवातीलाच अगदी वेळेत पाऊस झाला. त्यामुळे व मागील वर्षी अनपेक्षित कांद्याला मोठा भाव मिळाल्यामुळे येवला तालुक्याच्या अंदरसुल लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांनी सर्रास कांदा लागवडीवर भर दिला. त्यासाठी मोठ्या प्रमाणात रोपे तयार केली होती. सध्या दररोज कोसळणार्‍या पावसाने रोपे पिवळी पडून सडू लागली आहेत.

यातच जवळपास 70 ते 75 टक्के रोपे वाया गेल्याने अनेक शेतकर्‍यांनी पुन्हा नव्याने लाल कांदाङ्गबियाणे खरेदी करून रोपे तयारङ्गकरण्यासाठी लगबग सुरु केली आहे. तसेच लाल कांद्याच्या बियाणे आता शेतकरी चढ्या दराने खरेदी करत असून एक पायलीला जवळपास 12 ते 15 हजार रुपये किंमत मोजावी लागत आहे. वातावरणात बदल होत गेल्यामुळे उगवण झालेल्या रोपांना बुरशीचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे. याच बुरशीने मुळकुचही आली आहे.

त्यामुळे रोपे जमिनीवर आली असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. तर काही रोपांना हुमणीचीही बाधा झाल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले. लाल कांदा लागवडीसाठी किमान सव्वा ते दीड महिन्याची रोपे होणे अपेक्षित असते. जूनच्या पंधरवड्यातच शेतकर्‍यांनी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे रोपांसाठी बियांची फेकणी केली होती. अनेक ठिकाणी रोपेही लागवडीच्या टप्यातही आली हो. तीच रोपे आता वाया जात असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत

- Advertisment -

ताज्या बातम्या