दुष्काळात तेरावा महिना; कांद्याचे दर घसरले त्यात चोरट्यांनी मार्केटमधूनच कांदे चोरले

jalgaon-digital
1 Min Read

मनमाड | प्रतिनिधी

कोसळलेल्या कांद्याच्या भावात सुधारणा होताच कांद्याची चोरी सुरू झाली असून भवरी येथील प्रसाद गायकवाड या शेतकऱ्याने रात्री मनमाड बाजार समितीत लिलावसाठी आणलेला कांद्यावर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारत ट्रॅकटर मधून २ क्विंटल कांदा चोरी करून पसार झाले बाजार समितीत शेतमालाची सुरक्षितता धोक्यात आल्याने शेतकऱ्यांत खळबळ उडाली आहे.

मधल्या काळात कांद्याचे उसळलेले भाव शेतकऱ्यांना सुखावत होते त्यानंतर कांद्याचे भाव कोसळले होते सध्या कांद्याच्या भावात सुधारणा होऊन चांगला भाव मिळत असल्याचे पाहून चोरट्यांनी आपला मोर्चा कांदा चोरीकडे वळविला असून त्यांनी मनमाड बाजार समितीत लिलावसाठी आणलेल्या कांद्यावर डल्ला मारला.

नांदगांव तालुक्यातील भवरी येथील  प्रसाद गायकवाड या शेतकऱ्याने बाजार समितीत कांदे भरलेला ट्रॅक्टर लिलावसाठी रात्री ( ता ८ ) आणला होता बाजार समितीच्या आवारात ट्रॅक्टर लावला होता.

सध्या चांगलीच थंडी पडत असल्याने सदर शेतकरी झोपला असता अज्ञात चोरट्यांनी त्याच्या ट्रॅकटर मधून २ क्विंटल कांदा चोरी करून पसार झाले.

सकाळी कांद्याचा ट्रॅक्टर पाहिला असता कांदे कमी दिसून आले सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली. कांद्याला चांगले भाव येत असल्याने अगदी जीव लावून जगवलेले कांदे चोरट्यांनी चोरून नेल्याने शेतकरी हवालदिल झाला.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *