Friday, April 26, 2024
Homeनाशिककांदा दरात साडेपाचशे रुपयांची घसरण

कांदा दरात साडेपाचशे रुपयांची घसरण

लासलगाव | वार्ताहर | Lasalgaon

देशांतर्गत कांद्याच्या (Onions) मागणीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक वाढल्याने लासलगाव बाजार समितीत (Lasalgaon Market Committee) कांदा दरात काल प्रतिक्विंटल सुमारे साडेपाचशे रुपये घसरण झाली…

- Advertisement -

देशांतर्गत गुजरात (Gujrat), मध्य प्रदेश (Madhya pradesh), राजस्थान (Rajasthan) येथील शिखर तसेच पश्चिम बंगाल येथील सुखसागर या ठिकाणी वीन लाल कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असल्याने तसेच राज्यात नाशिक, अहमदनगर व पुणे जिल्ह्यातील चाकण आणि सोलापूर या भागातही नवीन उन्हाळ कांद्याची लाल कांद्याच्या बरोबरीने आवक होत असल्याने याचा थेट परिणाम कांद्याच्या भावावर झाला आहे.

लासलगाव बाजार समितीच्या मुख्य कांदा बाजार आवारावर शनिवारच्या तुलनेत सोमवारी कांद्यांच्या कमाल बाजारभावात साडेपाचशे रुपयांनी घसरण झाली आहे .

शनिवारी 1 हजार 233 वाहनातून 17 हजार 826 क्विंटल कांद्याची आवक झाली होती. दर कमाल 2625 प्रतिक्विंटल रुपये, किमान 651 रुपये तर सर्वसाधारण 2100 रुपये प्रतिक्विंटल होते. सोमवारी 1 हजार 850 वाहनातून 27 हजार 500 क्विंटल कांद्याची आवक लासलगाव झाली कमाल 2077 रुपये प्रतिक्विंटल, किमान 900 रुपये तर सर्वसाधारण 1750 रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव होता.

कांद्याची निर्यात (Onion exports) ही कमी असली तरी रशिया आणि युक्रेन युद्धाचा (Russia-Ukraine War) परिणाम कांद्यावर होण्याची शक्यता असल्याची चर्चा व्यापारी वर्गात होत असल्याने याकडे केंद्र सरकारने (Central Government) लक्ष देण्याची गरज आहे, असे लासलगाव बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे (Narendra Vadhawane) यांनी सांगितले.

कोट्यवधीचा फटका

लासलगाव बाजार समितीत 1 हजार 900 वाहनातून 27 हजार 500 क्विंटल लाल आणि उन्हाळ कांद्याची आवक झाली. साडेपाचशे रुपये प्रतिक्विंटल मागे कांद्याच्या बाजार भावात घसरण झाली. दिवसभरात लासलगाव बाजार समितीत विक्रीला आलेल्या कांद्याची आवक बघता शेतकर्‍यांना एक कोटी 37 लाख रुपयांचा फटका बसला. नाशिक जिल्ह्यात एकूण 17 बाजार समितीचा विचार केला तर हा आकडा मोठा असेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या